Nardeep Naithani Sakal
पुणे

वैद्यकीय सेवेस आम्ही सज्ज; ‘एएफएमसी’चे ११० पदवीधर लष्करात दाखल

‘एएफएमसी’चे संचालक व प्रमुख लेफ्टनंट जनरल नरदीप नैथानी यांच्या प्रमुख उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - वानवडी (Wanwadi) येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) (AFMC) ५५ व्या तुकडीतील ११० वैद्यकीय प्रशिक्षणार्थी (Medical Trainee) लष्करी वैद्यकीय सेवेमध्ये (एएफएमएस) (AFMS) दाखल होणार आहेत. यात २१ महिला प्रशिक्षणार्थ्यांचादेखील समावेश आहे. कोरोनामुळे पहिल्यांदाच ‘एएफएमसी’चा दीक्षान्त संचलन सोहळा (Dikshant Sanchlan Sohala) रद्द करण्यात आला आहे.

‘एएफएमसी’चे संचालक व प्रमुख लेफ्टनंट जनरल नरदीप नैथानी यांच्या प्रमुख उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नैथानी यांनी नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचे देशातील सर्वोत्तम एकात्मिक वैद्यकीय संघटना असलेल्या ‘एएफएमएस’मध्ये दाखल होत असल्याबद्दल अभिनंदन केले. २०१६मध्ये प्रवेश घेतलेल्या या तुकडीतील सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी पदवी मिळवून यशाची नोंद केली आहे.

नैथानी म्हणाले, ‘‘कोरोना विरुद्ध देशाचा लढा सुरू असताना हे प्रशिक्षणार्थी कोविड योद्धे म्हणून सेवेत दाखल होत आहेत. ‘एएफएमसी’मध्ये मिळालेले ज्ञान आणि कौशल्याचा वापर त्यांनी रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी करावा.’’

या प्रशिक्षणार्थींना कोविड केअर केंद्रांमध्ये काम करण्यासाठी दोन आठवड्यांचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी अमेरिकन हार्ट असोसिएशनचे बेसिक लाइफ सपोर्ट आणि ॲडवान्स्ड कार्डियाक लाइफ सपोर्ट (एसीएलएस) अभ्यासक्रम देखील पूर्ण केले आहेत. हे वैद्यकीय अधिकारी देशभरातील ‘एएफएमएस’च्या ३१ रुग्णालयांमध्ये प्रशिक्षणार्थी (इंटर्न) म्हणून त्वरित रुजू होणार आहेत. ही रुग्णालये लष्करी कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांसाठी विशेषत्वाने कोविड रुग्णालये म्हणून निश्चित केली आहेत.

महिला कॅडेट्सची बाजी

प्रशिक्षणा दरम्यान उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाप्रसंगी नैथानी यांच्या हस्ते ट्रॉफी, पदके आणि पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये विनिता रेड्डी ही सर्वोत्तम अष्टपैलू कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती सुवर्णपदकासह कलिंगा ट्रॉफी आणि डीजीएएफएमएस सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. कॉलेज कॅडेट कॅप्टन राहिलेल्या सुयश सिंग याला दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल ‘मेजर जनरल एनडीपी करणी ट्रॉफी’ देऊन गौरविण्यात आले. एमबीबीएस परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवल्याबद्दल निकिता दत्ताला ‘लेफ्टनंट जनरल थापर सुवर्णपदक’ प्रदान केले.

लष्करात दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या

  • ९४ - सैन्यदल

  • १० - हवाईदल

  • ६ - नौदल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT