Nirmala-Pansare
Nirmala-Pansare 
पुणे

झेडपीतर्फे जिल्ह्याचा समतोल विकास करू - निर्मला पानसरे

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्हा परिषदेकडून आगामी काळात जिल्ह्यातील सर्व भागांचा समतोल विकास करण्यावर भर दिला जाईल. यासाठी जिल्हा परिषदेचे उत्पन्नांचे स्रोत वाढविणे, सरकारकडील प्रलंबित निधी मिळविणे आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही पुणे जिल्हा परिषदेचे नवे अध्यक्ष निर्मला पानसरे व उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली. 

निवडीनंतर पानसरे आणि शिवतरे यांनी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट दिली. जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे माजी सभापती अरुण चांभारे आदी उपस्थित होते. 

पानसरे म्हणाल्या, ‘‘जिल्ह्यातील समतोल विकासासाठी सरकारकडील प्रलंबित निधी मिळविणे, ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील गावांसाठीचा विकास आराखडा जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करणे आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना मार्गी लावल्या जातील. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हेच अर्थमंत्री असल्याने, जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत उपचार बंद होतील - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT