weather update maharashtra possibility of rain monsoon in mumbai pune konkan maharashtra
weather update maharashtra possibility of rain monsoon in mumbai pune konkan maharashtra  google
पुणे

मॉन्सूनची प्रगती मंदावली, पण आज मुसळधार पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शनिवार (ता.११) पासून मॉन्सूनने पुण्या-मुंबईत मुक्काम केला असून, त्याची पुढील वाटचाल मंदावल्याचे दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशीही मॉन्सूनची उत्तर सीमा ही डहाणू, पुणे, गदग, बंगळूर, पदुच्चेरी आणि सिलिगुडी या शहरांतून पुढे सरकलेली नाही. मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण असतानाही, हवामान खात्याच्या माहितीनुसार रविवारी मॉन्सूनची वाटचाल जैसे थे पाहायला मिळाली आहे. मॉन्सूनने रविवारी दुपारपर्यंत मुंबई-पुण्यासह कोकणाचा बहुतांश भाग आणि दक्षिण महाराष्ट्र व्यापला आहे. पुढील चार दिवस मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण असून, गुजरात सह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मॉन्सूनची प्रगती अपेक्षीत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. रविवारी कोकण गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली होती.

मध्य महाराष्ट्रात सोमवारी प्रगती शक्य

कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाल्यानंतर पावसाला सुरवात झाली आहे. राज्याच्या विविध भागातही पूर्वमोसमी पावसाने जोर धरला आहे. मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने सोमवारी (ता. १३) संपूर्ण कोकणासह, मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात वादळी पावसाची शक्यता

राज्याच्या कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. सोमवारी (ता.१३) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर उर्वरित राज्यात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तर प्रदेशपासून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. दक्षिण गुजरात किनाऱ्यापासून उत्तर केरळपर्यंत पश्‍चिम किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण गुजरातपासून अग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा आणखी एक कमी दाबाचा पट्टा समुद्रसपाटीपासून ३.१ ते ४.५ किलोमीटरपर्यंत विस्तारला आहे. यामुळे पश्‍चिम किनारपट्टीवर ढगांची दाटी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT