mango.jpg 
पुणे

तळेगाव ढमढेरेच्या आठवडे बाजाराबाबत झाला निर्णय; काय ते वाचा सविस्तर

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : येथील आठवडा बाजार आणखी १५ दिवस भरणार नसल्याची महिती कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष तलाठी ज्ञानेश्वर भराटे व ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांनी दिली आहे.

शिक्रापूर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तळेगाव ढमढेरे हे गाव ५ किलोमीटरच्या अंतरात येत असून, तळेगाव ढमढेरे गाव बफर झोन मध्ये असल्याचे प्रांत अधिकाऱ्यांनी घोषित केले असल्याचे श्री खेडकर यांनी सांगितले. 

दरम्यान, सोमवार पासून काही अटींवर आठवडा बाजार सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली असली तरी तळेगाव ढमढेरे येथील उद्या सोमवारी (ता.८) भरणारा बाजार २० जून पर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना तळेगावच्या आठवडा बाजाराची आणखी १५ दिवस वाट पहावी लागणार आहे.

तळेगाव ढमढेरेचा आठवडा बाजार दर सोमवारी भरतो परंतु लॉकडाउनमुळे गेली २ महिन्यापासून आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला आहे. येथील बाजारात परिसरातील अनेक गावचे नागरिक भाजीपाला घेऊन येतात त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल होते परंतु कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT