vishal.jpg 
पुणे

शाळांच्या निकालाबाबत शासनाने घेतलेला मोठा निर्णय काय?

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : आरटीईअंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र, व्दितीय सत्रातील आकारिक मूल्यमापनानुसार आणि इयत्ता नववी व अकरावीचे प्रथम सत्र अखेरचे मूल्यमापन आणि व्दितीय सत्रातील अंतर्गत मूल्यमापनापैकी वीस गुणांच्या विविध प्रकारांपैकी जे कामकाज 13 मार्चअखेर उपलब्ध आहे. या दोन्हींची सरासरी घेऊन निकाल तयार करावा, असे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी आज (ता.२४) जारी केले आहेत.

शिक्षण आयुक्त सोळंकी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केले. ते म्हणाले, "निकालासंदर्भात  कोणतेही स्वतंत्र मार्गदर्शन प्रशासनामार्फत दिले जाणार नाही. झालेले शासन निर्णय काळजीपूर्वक अभ्यासून शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावर निकालाबाबत नियोजन करणे आवश्यक आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे13 मार्च 2020 पासून शैक्षणिक कामकाज बंद आहे. शासनाच्यावतीने मूल्यमापनात संदर्भात 20 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार आरटीईअंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या द्वितीय सत्रातील परीक्षा रद्द केल्याचे घोषित केले आहे. त्यांचे मूल्यमापन प्रथम सत्र अखेर पूर्ण झाले आहे. त्याशिवाय व्दितीय सत्रातील आकारिक मूल्यमापन जे 13 मार्च 2020 अखेर उपलब्ध असेल त्यानुसार निकाल तयार करून श्रेणी देण्यात यावी, असे सांगण्यात आले.

शासनाने 13 एप्रिल 2020 रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार इयत्ता नववी व अकरावी यांचे प्रथम सत्र अखेरचे मूल्यमापन आणि द्वितीय सत्रातील अंतर्गत मूल्यमापन पैकी वीस गुणांच्या विविध प्रकारांपैकी जे कामकाज 13 मार्च 2020 अखेर उपलब्ध असेल या दोन्हींची सरासरी घेऊन निकाल तयार करावा. या सरासरीला प्रचलित पद्धतीनुसार भाषा विषय गट गणित व विज्ञान गट उत्तीर्णतेचे निकष व सवलतीचे गुण यांच्या आधारे अंतिम निकाल तयार करण्यात यावा.

दरम्यान, यात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पुनर्रपरीक्षेची संधी नियमानुसार मिळेल. या सर्व कामकाजात 8 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयास अधीन राहून मूल्यमापन करावे. निकाल तयार करणे लॉकडाऊन काळात शाळेत जाण्याची आवश्यकता नाही. तीन मेच्या पुढे परिस्थितीनुसार निकालाच्य तारखेबाबत योग्य आदेश येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan-Sambhajinagar Highway Crash: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातील आंदोलन स्थगित! 'वर्षा' बंगल्यावर आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

Rahul Gandhi: ''काँग्रेसचा इतिहासच दलितविरोधी'', राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपचा जोरदार पलटवार

ISRO GSLV F-17 launch: आठ महिन्यांनंतर इस्रोची उड्डाणशृंखला पुन्हा सुरू; जीएसएलव्ही एफ-१७ वरून भूस्थिर कक्षेत ईओएस-०५ दूरसंवेदन उपग्रहाचे ४ सप्टेंबरला प्रक्षेपण

Nepal Flood Miracle Rescue: नेपाळच्या महापुरातून ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची चमत्कारिक सुटका; ढिगाऱ्यांतून फुललेली जगण्याची उमेद

SCROLL FOR NEXT