पुणे

नारायणगाव परिसरात कोरोनाची काय आहे स्थिती; घ्या जाणून

रवींद्र पाटे

नारायणगाव : रॅपिड सर्व्हेक्षण मोहीमे अंतर्गत हॉटस्पॉट असलेल्या वारुळवाडी शहर व परिसरातील वाड्यावस्त्यांमध्ये १३ हजार ८४३ नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.तपासणीत २४० संशयित रूग्ण आढळून आले.या रूग्णांची ऍन्टीजेन टेस्ट केली असता २१ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले.२१९ संशयित रुग्णांना होम क्वारंनटाईन करण्यात आले आहे.अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.

वारुळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत असणाऱ्या १४ गावात मागील दोन महिन्यांत कोरोना संसर्ग वाढला आहे.रोज सुमारे वीस नवीन रूग्णांची भर पडत आहे. आज अखेर सोळा रुग्णांचा मृत्य झाला आहे.हॉटस्पॉट असलेल्या नारायणगाव, वारुळवाडी भागांतील कोरोना संसर्ग  साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रॅपिड सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आले होते.पहिल्या टप्प्यात नारायणगावा तील  २० हजार ८३२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणीत ३३ कोरोना रूग्ण आढळुन आले.या बाबत डॉ. गुंजाळ म्हणाल्या रॅपिड सर्व्हेक्षण करण्यासाठी सुमारे १५० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तपासणी पथकात सबनीस विद्यालयातील शिक्षक ,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आदीचा समावेश आहे. पथकाने वारुळवाडी परिसरातील ३ हजार २८५ कुटुंबातील सदस्यांची घरोघरी जाऊन ऑक्सीमीटर, थर्मामीटरद्वारे तापमान,ऑक्सिजन पातळी व इतर लक्षणांची तपासणी केली.वारुळवाडी ग्रामपंचायतिचे माजी सरपंच जंगल कोल्हे, सचिन वारुळे,विपूल फ़ुलसुंदर यांनी सर्व्हेक्षण मोहीमेसाठी मदत केली.

रॅपिड सर्व्हेक्षणा अंतर्गत चौदा गावांपैकी  नारायणगाव व वारूळवाडी या दोन गावांची वैद्यकीय तपासणी पूर्ण  झाली असून सोमवारी(ता.१४) येडगाव परिसराची तपासणी करण्यात येईल. त्या नंतर उर्वरित अकरा गावांची  तपासणी करण्यात यईल.वैद्यकीय तपासणीसाठी नागरिकांनी पथकातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.-डॉ. वर्षा गुंजाळ 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT