पुणे

'जनता कर्फ्यू'ला जुनी सांगवीत प्रतिसाद, तर नवी सांगवीत होती ही परिस्थिती

रमेश मोरे/मिलिंद संधान

जुनी सांगवी (पुणे) :  पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पुकारलेल्या जनता कर्फ्यूला जुनी सांगवीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ व्यापाऱ्यांनी बंद ठेवली. यातच पावसाळी वातावरण असल्याने सकाळपासूनच सांगवी व परिसरात हलक्या सरी बरसत होत्या. त्यात रस्त्यावर क्वचित नागरिक दिसत होते. तर दापोडी परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. येथील रस्त्यावरून काही ठिकाणी भाजीविक्री सुरू होती. तर चिकन मटणाच्या दुकानांमधून मटण खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ दिसत होती. हिच परिस्थिती जुनी सांगवी परिसरात रविवार असल्याने पहायला मिळाली. तर जनता बंदसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून बंद पाळण्यासाठी व्यापारी, भाजी विक्रेते यांना आवाहन करण्यात आले होते. अपवाद वगळता परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

नवी सांगवीत जनता कर्फ्युला संमिश्र प्रतिसाद

नवी सांगवी ( पुणे ) : महापौर व आयुक्तांनी केलेल्या आवाहनास नवी सांगवी, पिंपळे गुरव व पिंपळे सौदागरात संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सारखेच घरात थांबण्याच्या आवाहनाला लोक कंटाळले असल्याचेच चित्र यावरून दिसून येत आहे. एरवी रविवार सुटीचा दिवस असला, तरी फारशी वर्दळ रस्त्यांवर दिसत नाही. परंतु, आज सकाळपासूनच ढगाळ हवामान व अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी यामुळे नागरिक जनता कर्फ्युची स्थिती पहायला घराबाहेर पडत होते. बहुतांश दुकाने बंद असली, तरी काही ठिकाणी दरवाजे अर्धवट उघडून व्यवसाय केला जात होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज गुरूपौर्णिमा असल्याने नागरिकांनी हारफुले व पुजा साहित्य घेण्यासाठी गर्दी केली होती. क्रांती चौक, काटेपुरम चौक याबरोबर परिसरातील बहुतांश चौकातील या दुकानांत गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंग न राखल्याचे चित्र सर्रास दिसत होते. एरवी येथील साईचौक गुरूपौर्णिमेला दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीने फुल झालेला असतो. परंतु, आज गर्दी जरी नसली, तरी भाविकांची दर्शनासाठी ये-जा चांगलीच दिसत होती. त्याचप्रमाणे कृष्णा चौक, पिंपळे गुरव येथील नेताजीनगर, पिंपळे सौदागर या ठिकाणच्या दत्तमंदिरात भाविकांची वर्दळ नजरेत भरत होती. त्यामुळे 22 मार्चला जो कडकडीत जनता कर्फ्यु पाळला गेला होता. त्याचा लवलेशही आज दिसत नव्हता. अर्थात तीन महिन्यांनंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने नागरिकांनी पुन्हा स्वतःला कोंडून घेणे हे जिकरीचेच म्हणावे लागेल.

नवी सांगवी, पिंपळे गुरव व सौदागर परिसरातील मेडिकल, दूध डेअरी चालू असल्या, तरी ठिकठिकाणी भाजीवाले व पथारीवाल्यांनी आपली दुकाने थाटल्याने कर्फ्युला हरताळ फासला जात होता. समर्पण युवा शक्ती ट्रस्टचे अध्यक्ष व माजी स्वीकृत प्रभाग सदस्य शिवाजी पाडुळे यांनी कृष्णाचौकात कालपासूनच भाजीविक्रेत्यांना नम्रपणे पुढील दहा दिवस आपला व्यवसाय बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे आज गर्दी व गोंगाटाने भरलेला कृष्णा चौक आज मोकळ्या श्वास घेताना दिसत होता. काटेपुरम चौकात एक जेष्ठ भाजीविक्रेता पोलिसांची गाडी आली तर मोठ्याने ओरडून इतर भाजीविक्रेत्यांना सावध करीत होता. त्यामुळे कोरोणा या महामारीला कोणीही आज गांर्भियाने घेत नसल्याचे नक्कीच सिद्ध झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honor Killing Case : 40 वर्षाच्या तरुणाचं 19 वर्षाच्या तरुणीवर प्रेम; मुलीच्या घरात कळताच बापानं गाडीतच गळा चिरून केली प्रियकराची हत्या

Mumbai News: मद्य परवानगीवर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह, धोरणाबाबत पुनर्विचार करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरली विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करताना पोलिस प्रशासनाकडून मारहाण

१८७ पदांसाठी ८ हजार उमेदवार, थेट विमानतळाच्या धावपट्टीवर घेतली परीक्षा; पाहा Drone VIDEO

Pirangut Accident : पिरंगुट घाटात भीषण अपघात; तिघेजण जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही

SCROLL FOR NEXT