Crime1.jpg 
पुणे

पुण्यातील `या` भागात अवैध व्यावसायिक जोमात...

सकाळवृत्तसेवा

किरकटवाडी (पुणे) : हवेली उपविभागातील विविध पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू, ताडी व गांजा विक्रीच्या व्यावसायाला उधाण आले आहे. त्यामुळे ३० जणांना तडीपार करण्याचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, महिना होत आला तरी त्यांच्यावर अजून कारवाई झालेली नाही. 

हवेली पोलिसांकडून या व्यावसायिकांवर वारंवार कारवाई करण्यात येते. मात्र, ते व्यवसाय करण्याचे थांबवत नसल्याने पोलिस यंत्रणाही हतबल झाली आहे. त्यामुळे हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे-पाटील यांनी या व्यावसायिकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्याची मागणी उपविभागीय दंडाधिकारी सचिन बारवकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तर कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींनाच क्वारंटाइन करण्यासाठी जागा अपुरी पडत असताना या अवैध व्यावसायिकांना क्वारंटाइन करण्याची व्यवस्था करायची कशी? असा प्रश्न अधिकाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

प्रशासनाच्या या गोंधळामध्ये अवैध व्यावसायिक मात्र मोकाट फिरत आहेत. ताडी, दारू व गांजा खरेदीसाठी शहराच्या विविध प्रतिबंधित भागातून हवेली परिसरात नागरिक ये-जा करत असल्याने संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st Test: शुभमन गिलचं शतक फक्त २ धावांनी हुकलं, पण धोनीचा मोठा विक्रम मोडला! दिग्गजांच्या यादीत सामील

Kolhapur Gokul Politics| राहुल गांधींपासून अमित शहांपर्यंत गोकुळच्या राजकारणात राष्ट्रीय नेत्यांनी लक्ष का घातलं?

मुलगी अन् सुनेमध्ये फरक करताच, आता नातवंडांमध्येही भेद? जया बच्चन यांचा फोन वॉलपेपरच सगळं सांगतोय, असं आहे तरी काय?

Latest Marathi News Live Update : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आईवर अंत्यसंस्कार

Padmaja Venugopal Resigns : 'गडबडीने भाजपमध्ये गेलो पण निर्णय चुकला' माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलगीचा तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT