vaccine 
पुणे

Sakal Exclusive : 'सिरम'मधून कधी होणार लस वितरण? 

योगिराज प्रभुणे

पुणे : कोरोना प्रतिबंधक लसिच्या वितरणासाठी केंद्र सरकारच्या अंतिम आदेशाची आता प्रतीक्षा आहे. लस वितरणाची सर्व जय्यत तयारी झाली असून, आज रात्री उशिरापर्यंत किंवा मंगळवारी सकाळपर्यंत या बाबतचे अंतिम आदेश केंद्राकडून येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्या प्रमाणे लस वितरण देशात सुरू होईल. 


"सेंट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन"ने (सीडीएससीओ) आँक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्टाझेनेका यांनी विकसित केलेल्या आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (एसआयआय) विकसित झालेल्या कोव्हिशिल्डला आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्‍सिन या दोन लसींना आपत्कालीन वितरणासाठी परवानगी दिली. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया व्ही. जी. सोमाणी यांनी दिली. त्यानंतर अकरा दिवसांनी आता लस वितरण होत आहे. या दरम्यान लशीची नेमकी खरेदी किंमत, कोणत्या कंपनीच्या किती लसी सरकार खरेदी करेल, त्याचे वितरण व्यवस्था कशी असेल, त्याचे लसीकरण कसे होईल याची तयारी या अकरा दिवसांमध्ये करण्यात येईल. ही तयारी आणि खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष लस वितरणाच्या टप्पा सुरू होत आहे. 

हेही वाचा - नथुराम गोडसेबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

कोरोना विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंधित करणारी कोव्हॅक्‍सिनचे पुण्यात उत्पादित करण्यात आली आहे. त्यामुळे देशातून सर्व शहरांना ही लस पुण्यातून वितरित केली जाईल. त्यासाठी पूर्व, पश्‍चिम, दक्षिण आणि उत्तर या दिशांप्रमाणे वर्गवारी केली आहे. या लस वितरणाच्या मुख्य केंद्रावर पुण्यातून लस वितरित होणार आहे. त्यासाठी 12 ते 10 कोल्ड स्टोअरेज ट्रक सज्ज ठेवले आहेत. केंद्राचा आदेश मिळताच हे ट्रक आकुर्डीवरून हडपसर येथील सिरम इन्स्टिट्युटमध्ये जातील. तेथे ट्रकमध्ये लशीचे डोस अपलोड होतील. त्यानंतर ते विमानतळावर जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Scheme: गर्भलिंग निदानाची माहिती द्या एक लाख मिळवा; स्त्रीभ्रूण हत्यांना आळा घालण्यासाठी सरकारचे पाऊल, काय आहे खबरी योजना?

Pimpri Chinchwad: अतिक्रमणांचा विळखा; कारवाई कागदोपत्रीच, रुपीनगर अंकुश चौक मार्गाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : नाशिक- पुणे महामार्गावर सुरू असलेले हिंदू संघटनांचे ठिय्या आंदोलन मागे

Mumbai News: कलिना विद्यापीठाच्या जागेचे सीमांकन करा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेत सत्तेचे समीकरण बदलणार? स्थायी समिती सभापतिपदासाठी बुधवारी चुरस

SCROLL FOR NEXT