Who is Arun Rathod related to Puja chavan suicide case? 
पुणे

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; कोण आहे अरुण राठोड?

सकाळवृत्तसेवा

पुणे : पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येचा विषय सध्या चर्चेत आहे. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येशी राज्यातील एका मंत्र्याचा संबध असल्याची चर्चा सुरू असतानाच सोशल मीडियावर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. या ऑडिओ क्लिपचा पूजाच्या आत्महत्येशी संबध असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, या ऑडिओ क्लिपमध्ये एक नाव समोर आले ते म्हणजे अरुण राठोड. कोण आहे अरुण राठोड? पूजा चव्हाण ही अरुण राठोडच्या संपर्कात होती का? पूजाच्या आत्महत्येशी अरुण राठोड यांचा काही संबध आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. 

तो आवाज अरुण राठोडचा?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये 4 व्यक्तींचे आवाज आहेत. त्यापैकी पहिला आवाज एका मुलीचा आवाज असून, तो पूजा चव्हाण हिचा तर दुसरा आवाज आहे तो एका राजकीय व्यक्तीचा असल्याची चर्चा सुरू आहे. तिसरा आवाज पूजाच्या भावाचा असल्याचे म्हटले जात आहे तर, चौथा आवाज हा अरुण राठोड या व्यक्तीचा असल्याचे सांगितले जात आहे. 

टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; राज्यातील मंत्री अडचणीत ?

ऑडिओ क्लिपमधील संवादात ही एक व्यक्ती अरुणला वारंवार सूचना देत आहे. पूजाने आत्महत्या केली तेव्हा अरुण तेथेच उपस्थित होता असेही म्हंटले जात आहे. अरुणला पूजा आत्महत्या करण्याचा विचार करतेय हे माहित होते, तशी माहितीही त्याने फोनवरील व्यक्तीला दिली होती.

कोण आहे अरुण राठोड? 
अरुण सुभाष राठोड (वय 24) असे त्याचे पूर्ण नाव असून तो वनविभागात नोकरी करत आहे. मुळचा बीड जिल्ह्यातील परळी येथील दारावती तांडा येथील रहिवासी आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या संपर्कात असल्याची देखील चर्चा सुरू आहे. पुजा चव्हाण आत्महत्येपूर्वी तिच्या भावासोबत पुण्यातील वानवडी येथे राहात होती. अरुण राठोडही तेथेच राहात असल्याची माहिती मिळत आहे. 

अरुण राठोड बेपत्ता
अरुण राठोड यांचा जबाबही पोलिसांनी घेतला आहे. त्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सध्या अरुण राठोड आपल्या कुटुंबीयांसोबत बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे.

कोण आहे टिक-टॉक स्टार पुजा चव्हाण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bangalore Highway : 92 पिलर अन् 3.47 किमी लांबी! पुणे-बंगळूर महामार्गावरील सर्वात मोठा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार? लोकार्पण लांबणीवर, वाचा नवीन अपडेट

ICAI CA Toppers List : डोंबिवलीचा सुपुत्र देशभर गाजला! सोहन मांजरेकर ठरला देशातील तिसरा CA टॉपर; संपूर्ण टॉपर यादी पाहा

Shubman Gill:'गिलला टी-२० संघातून का डच्चू दिला?' मोहम्मद अझरुद्दीनचा BCCI ला थेट सवाल

Eknath Shinde यांनी लोकसभेतील संख्याबळाचे गणित बदललं! NDA मध्ये बनतील शक्तिशाली नेते; जागांचे गणित पाहा...

Farmer Protest: कर्जमुक्तीच्या लढ्याचा वणवा राज्यभर! तहसील कार्यालयावर व पाण्याच्या टाकीवर चढले शेतकरी, बुलडाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT