Corona-patient 
पुणे

कोरोना रुग्णांच्या मृत्यूसाठी कोण जबाबदार; वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना रुग्णांच्या मृत्यूसाठी प्रशासकीय दिरंगाई आणि वैद्यकीय यंत्रणेचा बेजबाबदारपणाही तितकाच कारणीभूत असल्याचे मत केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. या निरीक्षणामुळे संशयित रुग्णांच्या ‘स्वॅब’ची तपासणी, तिचा अहवाल आणि त्यानंतरच्या उपचारांदरम्यान काही जणांचा बळी गेल्याने या दोन्ही यंत्रणांनी कामाचा वेग वाढविण्याची अपेक्षावजा सूचना या पथकाने महापालिकेला केली आहे. ‘स्वॅब’ तपासणीचे प्रमाण वाढवतानाच रुग्ण शोधून काढण्याची गरजही पथकाने स्पष्ट केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी कुणाल कुमार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या पथकाने पाहणी करीत; प्रत्यक्ष वस्तुस्थिती जाणून घेतली.रुग्ण वाढीचा वेग, त्यामागची कारणे, त्यावरचे उपाय, रुग्णांवरील उपचार, कोरोनामुक्तांचे प्रमाण, मृत्यूदर, त्यांच्या कारणांचाही त्यांनी शोध घेतला. यासंदर्भात महापालिका, खासगी हॉस्पिटल, कोविड केअर सेंटरमधील रुग्ण, वैद्यकीय-प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून पथकातील अधिकाऱ्यांनी काही बदल सूचविले आहेत.  विशेषत: रुग्णांचा शोध, तपासणी आणि प्रत्यक्ष उपचार यंत्रणेत वेळ जात असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले असून, त्याला प्रशासकीय आणि वैद्यकीय यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव कारणीभूत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

यंत्रणेवर मर्यादा
आधीच अुपऱ्या असलेल्या आरोग्य आणि त्यासंबंधीच्या यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर ताण आला आहे. सगल अडीच-तीन महिने काम सुरू असून, त्यामुळे यंत्रणेतील बहुतांशी घटकांवर मर्यादा आल्या आहेत. आरोग्य खात्याची व्याप्ती वाढविण्याची गरजही या पथकाच्या पाहणीतून पुढे आले आहे. त्यामुळे वैद्यकीय अभ्याक्रमातील विद्यार्थ्यांना ‘इंटर्नशीप’ साठी घेण्याचा प्रयोग करता येईल, अशी सूचनाही करण्यात आली आहे. 

बदल्यांची शिफारस
कोरोनाचे संकट उभे ठाकले असतानाही महापालिका, जिल्हा प्रशासन आणि अन्य सरकारी खात्यातील अधिकारी यांचा बेजबाबदारपणा लपून राहिलेला नाही. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना बदलण्याची शिफारस हे पथक करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

उपचारांचे ऑडिट हवे
नागरिकांची तपासणी करून त्यांना वेळीच आणि नेमके उपचार दिले जात आहेत का याचेही ऑडिट करण्याची गरज या पथकाने व्यक्त केली आहे. ही कारणे स्पष्ट झाल्यानंतरच नेमके उपाय करून मृत्यूदर कमी करता येणार आहे, असेही या पथकाने महापालिकेच्या निदर्शनास आणून दिले. 

केंद्रीय पथकाचा सल्ला

  • रोजच्या रुग्णांच्या तपासणीत सातत्य हवे.
  • तपासणी वाढवून रुग्णांचा लवकर शोध घ्यावा. 
  • रुग्ण सापडल्यानंतर लवकर पावले उचलावीत.  
  • अहवाल लवकर देऊन रुग्ण आणि संपर्कातील व्यक्तींवर उपचार.

या आहेत त्रुटी

  • कधी दीड हजार तर कधी अडीचशे ते चारशेच नागरिकांचे स्वॅब.
  • रुग्णवाहिका वेळेत रुग्णांपर्यंत पोचत नसल्याच्या तक्रारी
  • पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचाराला विलंब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI व्यवहारांवर MDR चार्ज लावण्याच्या निर्णयानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी! कारण काय?

गोकुळच्या 25 जागांसाठी रणसंग्राम! महायुतीत धुसफूस, मुश्रीफांचा भाजपला इशारा?

गेल्यावेळी मुंबईत धिंगाणा घातलात, घाण केलीत; लोकांचे सण खराब केले, हिंदुस्थानी भाऊची जरांगेंवर वादग्रस्त शब्दात टीका

Short Circuit Suspected Behind Fire : आनंदाच्या वातावरणाला आगीचे ग्रहण : शॉर्टसर्किटमुळे घराला आग; दोन मुलींसह आई आणि चुलतीचा मृत्यू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

SCROLL FOR NEXT