Sant-Tukaram-Sugar-Factory
Sant-Tukaram-Sugar-Factory 
पुणे

संत तुकाराम कारखान्यासाठी आज कोण बाजी मारणार

सकाळवृत्तसेवा

पौड - श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी (ता. १६) झालेल्या निवडणुकीत मुळशी, मावळ, खेड, शिरूर, हवेली या तालुक्‍यांतील ५७ केंद्रांवर ५२.९९ टक्के मतदान झाले. २१ हजार ५३८ मतदारांपैकी ११ हजार ४१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कारखान्याच्या १८ जागांसाठी २५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. सोमवारी (ता. १७) सकाळी नऊ वाजता वाकड येथील संत तुकाराम मंगल कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

संत तुकाराम कारखान्याच्या निवडणुकीसाठी मुळशी तालुक्‍यात हिंजवडी-ताथवडे गटात दहा; तर पौड-पिरंगुट गटात नऊ केंद्रे होती. मावळ तालुक्‍यात वडगाव-तळेगाव गटात नऊ आणि सोमाटणे पवनानगर गटात आठ केंद्रांचा समावेश होता. खेड तालुक्‍यात सतरा, हवेलीत चार; तर शिरूरमध्ये दोन केंद्रे होती.

मुळशी तालुक्‍यात एकूण मतदार ६७९२ आहेत. त्यापैकी हिंजवडी-ताथवडे गटात १७९० आणि पौड-पिरंगुट गटात १६३०, अशा एकूण ३४२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्‍यात ५२.१० टक्के मतदान झाले. मावळ तालुक्‍यात ५६७६ मतदार आहेत. त्यामध्ये वडगाव-तळेगाव गटातून १६५९ आणि सोमाटणे-पवनानगर गटातून १४२४, अशा एकूण ३०८३ मतदारांनी मतदान केले. मतदानाचे हे प्रमाण ५४.४१ टक्के आहे. हवेली तालुक्‍यात १६३८ मतदार आहेत. त्यापैकी ९१८ म्हणजेच ५६.०४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शिरूर तालुक्‍यातील ९३४ मतदारांपैकी ४२३ मतदारांनी मतदान केले. हे प्रमाण ४५.२८ टक्के आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT