Pune Crime esakal
पुणे

Pune Crime: पुण्याच्या शुक्रवार पेठेतील पती-पत्नीच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं; धक्कादायक कारण समोर

शुक्रवार पेठेतील चिंचेच्या तालमीजवळ एका सदनिकेत ज्येष्ठ दांपत्य मृतावस्थेत आढळले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शुक्रवार पेठेतील चिंचेच्या तालमीजवळ एका सदनिकेत ज्येष्ठ दांपत्य मृतावस्थेत आढळले होते. या घटनेत पतीने पत्नीचा नाडीने गळा आवळून खून करून आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

हेमंत रामकृष्ण थोरात (वय ६४) आणि त्यांची पत्नी सुनीता थोरात (वय ५८, दोघे रा. चिंचेची तालीम, शुक्रवार पेठ) असे दांपत्याचे नाव आहे.

रविवारी सकाळी थोरात यांच्या घराचा दरवाजा बंद असल्यामुळे शेजाऱ्यांनी बाहेरून हाक दिली. परंतु आतून कोणीही प्रतिसाद दिला नाही. ही बाब शेजाऱ्यांनी खडक पोलिसांना कळविली. पोलिस घटनास्थळी पोचले असता त्यांना सुनीता बेडवर बेशुद्धावस्थेत पडलेल्या होत्या. तर, हेमंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी दांपत्यास ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शवविच्छेदन अहवालानुसार पती हेमंत यांनी पत्नीचा नाडीने गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. सुनीता काही वर्षांपासून आजारी होत्या. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण निवृत्ती सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून खडक पोलिसांनी मृत पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांची मुले अमेरिकेहून परतल्यानंतर मंगळवारी या दांपत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती सहायक निरीक्षक सोनवणे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT