Ajit Pawar Esakal
पुणे

Ajit Pawar: पार्थ पवारांचा दारुण पराभव करणाऱ्या बारणेंच्या प्रचाराला अजित पवार!

Ajit Pawar: महायुतीसोबत गेलेले अजित पवार हे त्यांच्या सुपुत्रांचा पराभव करणाऱ्या श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला जाणार का अशा चर्चा सुरू होत्या. मात्र, आता श्रीरंग बारणे यांचा प्रचार करताना दिसून येण्याची शक्यता आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Ajit Pawar: राज्यासह देशभरात निवडणुकीचे वारे वाहु लागले आहे. निवडणुका तोंडावर असतानाच प्रचार, सभा, बैठका मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आहेत. अशातच महायुतीसोबत गेलेले अजित पवार हे त्यांच्या सुपुत्रांचा पराभव करणाऱ्या श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला जाणार का अशा चर्चा सुरू होत्या. मात्र, आता श्रीरंग बारणे यांचा प्रचार करताना दिसून येण्याची शक्यता आहे.

गेल्या निवडणुकीत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा श्रीरंग बारणे यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता, अजित पवारांसाठी ती निवडणुक मोठ्या प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची होती. त्यामध्ये बारणे यांनी पार्थ पवारांचा पराभव केला. आता तेच विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे महायुतीचे मावळचे उमेदवार आहेत. अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा एक भाग आहे, त्यामुळे अजित पवार बारणेंच्या प्रचाराला हजेरी लावण्याची शक्यता आहे.

दरम्यान आज(सोमवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील व उदय सामंत यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभा महायुती समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान पार्थ पवार यांचा दारूण पराभव करणाऱ्या श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला अजित पवार जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

मावळ मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विरूध्द शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे यांच्यात थेट लढत होणार आहे. दोन टर्म खासदार राहिलेल्या श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच या मतदारसंघात अजित पवार, चंद्रकांत पाटील यांच्यासह काही महत्त्वाच्या नेत्यांनी यासंबधी बैठकांचे नियोजन केले आहे.

तर दुसरीकडे पहिल्यांदाच लोकसभेची संधी मिळालेले संजोग वाघेरे यांनी देखील काही दिवसांपासून मतदारसंघात प्रचारास सुरूवात केली आहे. दोन्ही उमेदवारांनी विजयासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. अशातच श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार येणार का? अशी चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Womens T20 WorldCup: २४ चेंडूत वादळ, दक्षिण आफ्रिकेचा केला धुव्वा! महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची दणदणीत सुरुवात

मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला आश्वासक नायक; 'दादा, एक गुड न्यूज आहे' फेम ऋषी मनोहरचा नवा धमाका! १९ जूनला काय होणार खास?

दोर बांधायला विसरले, बंजी जंपिंगवेळी निष्काळजीपणा; २१ वर्षीय तरुणीला तशीच फेकली, जागीच मृत्यू

Mumbai News: मुंबईतील स्मशानभूमी होणार प्रदूषणमुक्त, 'कार्बनमुक्त स्मशानभूमी वायुप्रदूषण नियंत्रण प्रणाली' बसवणार

Latest Live Updates Marathi: लातूर-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT