पुणे - दिल्लीतील विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे राज्यकर्ते सांगत आहेत. परंतु प्रत्यक्षात काहीही हालचाल होत नसल्याने हे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. घराकडे परतण्यासाठी डोळे लावून बसलेल्या या विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असून अनावर झालेल्या अश्रुंचा आणि संयमाचा बांध फुटत आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
'एकीकडे घराची परिस्थती हालाखीची असतानाही पोटाला चिमटा काढून आई-वडील मुलांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी दिल्लीत पाठवले आहे. परंतु लॉकडाऊनमुळे गावाकडेही उत्पादनाचे साधन नसल्याने घरी अर्थसहाय्य मागणे अवघड जाता आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे दिल्लीत राहणेही त्यांना असह्य होत आहे. जेवणाची दयनीय स्थिती, गावाकडे जाण्याची ओढ परिणामी मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ लागला आहे,'' हे निरीक्षण मानसशास्त्रात पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या माधुरी गरूड हिने नोंदविले. माधुरी पुण्याची असून फर्ग्युसन महाविद्यालयातून तिने पदवी शिक्षण घेतले आहे. सध्या ती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तयारीसाठी दिल्लीत आहेत.
दिल्लीत सध्या अडकलेल्या जवळपास 1900 मराठी विद्यार्थ्यांनी टेलिग्रामवर गट केला असून त्याद्वारे ते एकमेकांशी संवाद साधत आहे. त्याशिवाय राज्य सरकार आणि दिल्ली सरकारमार्फत होणाऱ्या प्रयत्नांची माहिती देखील याद्वारे दिली जात आहे. तसेच जेवणाची, घर भाडे देण्याची अथवा अन्य समस्या उदभवत असल्यास ते टेलिग्रामच्या गटात आपली समस्या नोंदवितात. आणि अन्य विद्यार्थी एकत्रित येऊ त्या समस्येची आपापल्यापरीने उकल करत आहेत. जेवणाची सोय उपलब्ध होत नसेल, तर विद्यार्थ्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करणाऱ्या "अन्नपुर्णा' व्यवस्थेला संबंधित विद्यार्थ्यांला जोडून दिले जाते. याद्वारे हे विद्यार्थी एकमेकांना सहाय्य करत मार्गदर्शनही करत आहेत. मात्र, असे असले तरी लॉकडाऊनमुळे काही मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे मुलांना लवकरात लवकर घरी पोचविणे महत्त्वाचे असल्याचे माधुरी हिचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.