Withheld the honorarium of the students of Sarathi by pune university 
पुणे

विद्यार्थ्यांनो, लॉकडाऊनमध्ये पुणे सोडून गावी गेलाय? मग, 'सारथी'चे मानधन नाही

सकाळवृत्तसेवा

पुणे : 'कोरोना'मुळे पुणे सोडून गावाकडे गेलेल्या विद्यार्थ्यांचे मानधन 'सारथी'ने रोखले आहे. जे विद्यार्थी पुण्यात आहेत केवळ त्यांनाच मानधन दिले जात आहे. आमच्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

छञपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मानधन व शिक्षण दिले जाते. त्यासाठी राज्यातून सुमारे १३० विद्यार्थी निवडले गेले आहेत. त्यांना दक्षिण महिन्याला ८ हजार रुपये मानधन दिले जाते. 


ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना लाॅकडाऊनमुळे अनेक विद्यार्थी गावाकडे निघून गेले आहेत. त्यामुळे 'सारथी'ने जे विद्यार्थी गावाकडे गेले आहेत, त्यांचे मार्च व एप्रिल महिन्याचे मानधन दिलेले नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी अधिकार्यांकडे चौकशी केली असता जो विद्यार्थी पुण्यात आहेत त्यांनाच मानधन मिळणार आहे. निधी कमी असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांना सांगण्यात आले. 

पुणेकरांनो, सावधान! कोरोनाच्या बळींचे झालंय शतक

विद्यार्थीनी अश्विनी पवार म्हणाली, "मार्च महिन्यात आमचा मेस, रुम, अभ्यासिका यासाठी खर्च झाला आहे. रुमचे भाडे द्यावे लागणार आहे. त्यामुळे मानधन आवश्यक आहे. पण अधिकारी मानधन देण्यास टाळाटाळ करत आहेत. आत्तापर्यंत ४५ विद्यार्थ्यांचे मानधन मिळालेले नाही. आमच्यावर अन्याय न करता मानधन द्यावे" 

"जागतिक महामारीच्या काळात सगळेजण मेटाकुटीला अाले अाहेत.शेतकरी कुटुंबातील हहे विदयार्थी अाहेत. अशा परिस्थितीत हि संस्था रक्कम देत नाही हे अन्यायकारक अाहे. या विद्यार्थ्यांचे मानधन दिले जावे अशी मागणी स्टुडंट हेल्पींग हँडचे  अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी सारथीचे प्रमुख आनंत रायते यांच्याकडे मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकल्पाच्या संचालिका ज्योती शिंदे यांचा फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Stock Market Crash Today: काल तेजी, आज क्रॅश! शेअर बाजार अचानक का कोसळला? जाणून घ्या 5 मोठी कारणं

Ashok Kharat: भोंदू बाबाची 'स्पेशल २६ टीम'... बनावट छापे टाकण्यात अन् व्यापाऱ्यांना धमकावून जाळ्यात ओढण्यात माहिर

Baramati By-Election : मोठी बातमी ! बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, मल्लिकार्जून खर्गेंचे शरद पवार यांना आश्वासन

तरुणीच्या विनयभंग प्रकरणात अटक होईल, ५५ वर्षीय प्राचार्याला धमकावत ७ लाख उकळले; PSI, रिलस्टार महिला पोलिसासह तिघांवर गुन्हा

दुनियादारी फेम अभिनेत्याची स्ट्रगल स्टोरी! सुरुवातीच्या काळात नायकाची भूमिका नाकारली, पण मालिकांनी बदललं आयुष्य

SCROLL FOR NEXT