Sathe Family
Sathe Family  sakal media
पुणे

नातवांचं प्रेम! ८९ वर्षीय आजी १५ दिवसात कोरोनामुक्त

अक्षता पवार - सकाळ वृत्तसेवा

आजीचा दिनक्रम ठरलेला होता. तसेच ती राहत असलेली जागाच तिच्यासाठी सोयीची होती. तिला जर आम्ही आमच्या सोईप्रमाणे इतरत्र क्वॉरंटाईन केले असते, तर ती बैचेन झाली असती.

पुणे : मुलं काळजी घेत नाहीत म्हणून वृद्ध आई-वडील त्यांच्या विरोधात न्यायालयात गेल्याचे अनेकदा आपल्याला पाहायला मिळते, पण औंध येथे राहणाऱ्या दोन नातवांनी त्यांच्या आजीला कोरोना आहे, याची भनकही लागू न देता तिला पूर्ण बरे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तर ८९ वर्षीय आजीने देखील आपल्यास सर्दी-खोकला झाला आहे, असे समजून उपचार घेत कोरोनावर मात केली. (Without informing Grandma the grandchildren's healed her from Corona)

आजी कमला साठे यांच्याकडे घरकामासाठी येणाऱ्या मावशीला बरे नव्हते, म्हणून नात इशानी आणि नातू सौमित्र यांनी तिची टेस्ट करून घेतली. तर मावशी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी आजीची देखील टेस्ट करून घेतली. तेव्हा आजीला पण कोरोना झाल्याचे समजले. मात्र ती पॉझिटिव्ह असल्याचे नातवांनी तिला सांगितलेच नाही आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तिच्यावर घरीच उपचार सुरू केले. इशानी आणि सौमित्रचे वडील, काका आणि आत्या हे सर्वजण पन्नाशीच्या घरातील असल्याने त्यांना संसर्गाचा धोका होऊ नये, म्हणून या तिघांना दुसऱ्या घरात पाठवले.

तसेच आजीला आवश्‍यक ते सर्व आम्ही करू असे दोघांनी त्यांच्या बाबा, आत्या आणि काकाला सांगितले आणि त्यांनाही धीर दिला. याबाबत इशानी म्हणाली, "तुला कोरोना झाला आहे, असे आजीला सांगितले असते, तर ती आणखी घाबरली असती. त्यामुळे आम्ही तिला सांगितलेच नाही. रुग्णापासून आजार लपवून ठेवणे वैद्यकीयदृष्ट्या किती योग्य आहे माहिती नाही, पण तिची मानसिकता चांगली राहावी म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. काही दिवसांनंतर तिला ऑक्सिजन संवर्धक लावण्यात आला, पण नंतर तिची स्थिती सुधारत गेली आणि ती १५ दिवसांत पूर्ण बरी झाली."

आम्हालाच त्रास होत असल्याचे तिला सांगितले

आजी पॉझिटिव्ह असल्याने तिच्याजवळ जाताना आम्ही योग्य ती सर्व खबरदारी घेत होतो. त्यामुळे तुम्ही अचानक एवढी काळजी का घेताय, मला काही झाले आहे का? घरातील इतर लोक कुठे गेले अस ती विचारू लागली. त्यामुळे आम्ही तिला सांगितले की आम्हालाच बरे नाही. आमच्यामुळे तुला काही होऊ नये म्हणून काळजी घेत असल्याचे तिला पटवून दिले, असे सौमित्र यांनी सांगितले.

तिला तिची स्पेस दिली

आजीचा दिनक्रम ठरलेला होता. तसेच ती राहत असलेली जागाच तिच्यासाठी सोयीची होती. तिला जर आम्ही आमच्या सोईप्रमाणे इतरत्र क्वॉरंटाईन केले असते, तर ती बैचेन झाली असती. तसेच तिला कोरोना झाल्याचेही सांगावे लागले असते. त्यामुळे आम्ही तिला तिच्या स्पेसमध्ये राहू दिले. तिला आम्ही मटार सोलायला द्यायचो किंवा इतर काही तरी सोपं काम करायला द्यायचो. तिला वाटू दिले नाही की ती वेगळी आहे म्हणून. तिचं रोजचं आयुष्य नेहमीप्रमाणे सुरू राहिल्याने तिला बरे होण्यास मदत झाली असावी, असे सौमित्राने सांगितले.

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT