Yuvraj Sambhaji Chhatrapati sakal
पुणे

Shiv Rajyabhishek Sohala : ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार व्हा - युवराज संभाजी छत्रपती

६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

समाधान काटे

पुणे - 'शिवराज्याभिषेक सोहळा लोकऊत्सव व्हावा, त्याची व्याप्ती जगभर पोहचावी म्हणून, २००७ साली रायगडावर एक हजार शिवभक्तांनी सुरू केलेला शिवराज्याभिषेक सोहळ्यास आज अडीच ते तीन लाख शिवभक्त प्रत्यक्ष उपस्थित राहतात.

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे यंदाचे ३५० वे वर्ष असल्याने छत्रपती शिवरायांच्या जीवन कार्यातील त्यांच्यावर झालेले राजमाता जिजाऊ व छत्रपती शहाजीराजे यांचे संस्कार, महाराजांचे जन्म ठिकाण, त्यांची राज्य विस्ताराची ठिकाणे, पवित्र नदी, अशा महत्त्वपूर्ण ठिकाणावरून पवित्र पाणी (जल) आणले जात आहे. तरी लाखो शिवभक्तांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे" असे आवाहन युवराज संभाजी छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत केले.

६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी युवराज संभाजी छत्रपती बोलत होते. पाच व सहा जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा साजरा होत आहे. देशभरातील लाखो शिवभक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

राज्याभिषेक सोहळ्याची रूपरेषा

५ जून सायं ४ वाजल्यापासून महादरवाजा पूजन, तोरण बांधणे, रायगड जिल्हा प्रशासन, २१ गावातील सरपंच, पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या हस्ते गडपूजन, 'धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची शिवकालीन युद्धकलांची मानवंदना, जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा शाहीरी मानवंदना, गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ, जगदीश्वराचे वारकरी संप्रदायाकडून कीर्तन व भजन.

६ जून सकाळी ७ पासून

राणवाद्यांच्या जयघोषात युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण, शाहीरी कार्यक्रम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे वाद्यांच्या गजरात आगमन, युवराज संभाजी छत्रपती व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत व राजसदरेवर आगमन, युवराज संभाजी छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषेक, युवराज संभाजी छत्रपती यांचे शिवभक्तांना संबोधन, जगदीश्वराच्या दर्शनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे प्रस्थान, जगदीश्वर दर्शन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस अभिवादन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT