Gold_Fraud 
पुणे

सोने खरेदीत गुंतवणुकीचं आमिष दाखवून कोटींना गंडा; पुण्यातील नामवंत सराफी पेढीकडून फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सोने खरेदीमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून लक्ष्मी रस्त्यावरील एका नामवंत सराफी पेढीकडून एका महिलेसह तिच्या नातेवाईकांची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका सराफी पेढीच्या मालकासह पाचजणांविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 'मराठे ज्वेलर्स'चे मालक मिलिंद उर्फ बळवंत अरविंद मराठे, कौस्तुभ अरविंद मराठे, मंजिरी कौस्तुभ मराठे, नीना मिलिंद मराठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शुभांगी कुटे (रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन त्यांच्याविरुद्ध फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध कायद्यानुसार (कलम तीन) (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुटे यांना 2017 मध्ये सोन्यात गुंतवणूक करायची होती. त्यावेळी त्यांना सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक आणि चांगला परतावा मिळेल, असे सराफी व्यावसायिक मराठे यांनी सांगितले होते. त्यामुळे कुटे यांनी 37 लाख 80 हजार रुपये गुंतवले होते. तर कुटे यांच्या सोलापूरमधील नातेवाईकांनी 25 लाख रुपये गुंतविले होते. मराठे यांच्याकडे कुटे यांच्यासह नातेवाईकांनी एक कोटी पाच लाख 80 हजार रुपये गुंतवले होते.

कुटे आणि त्यांच्या नातेवाईकांनी गुंतवणूक केल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार फसवणूक आणि महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध कायदा (एमपीआयडी) कलम तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातचा तपास पोलिस निरीक्षक बडे करत आहेत.

मिलिंद मराठेंचा पाच महिन्यांपूर्वीच मृत्यू
"मराठे ज्वेलर्स'चे मालक मिलिंद मराठे यांनी त्यांच्या लक्ष्मी रस्त्यावरील सराफी दुकानातच स्वत:वर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणानंतर राज्यभर कारवाईचा धडाका; महिन्यात 15 भोंदू बाबांवर गुन्हे दाखल, नाव-गावासह 'अंनिस'ने यादीच केली जाहीर

IPL 2026 : स्टार खेळाडूंसोबत शेवटचा'सेल्फी'! १४ वर्षीय अभव, २० वर्षीय क्रिकेटपटूचा जागीच मृत्यू; DC vs RCB सामन्यानंतर भयानक घडलं

ओबेन इलेक्ट्रिककडून Rs. 99,999 रूपये या सुरुवातीच्या किमतीत Rorr EVO सुपर बाइक लाँच; दमदार फीचर्स पाहा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे येथील सुरभी लॉजवर पोलिसांचा छापा

MLC Election: झीशान सिद्दीकींच्या उमेदवारीमुळे वाद पेटला; एक बडा नेता शिवसेनेकडे वळला? तर दुसरा दुखावला, राष्ट्रवादीत बंडाची चाहूल!

SCROLL FOR NEXT