pune
pune sakal
पुणे

परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : परदेशात नोकरी लावण्याचा बहाणा करून एका महिलेने अनेक तरुण-तरुणींची फसवणूक केली होती. यासंबंधी गुन्हा दाखल झाल्यापासून तब्बल 16 वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या महिलेस गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. राहत तालीबअली सैय्यद उर्फ अलका भगवानदास शर्मा (वय 54, रा. आनंदयोग सोसायटी, विमाननगर, मूळ रा. जागीरपुरी, दिल्ली) असे अटक (Woman arrested) केलेल्या महिलेचे नाव आहे. याच प्रकरणामध्ये 2005 मध्ये अबिदअली मसुदअली सैय्यद, अब्दुलवहाब महमंदहनीफ मुजावर, राहत सैय्यद यांच्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी ज्ञानेश्वर जमदाडे यांनी फिर्याद दिली होती. या घटनेमध्ये फिर्यादीसह त्यांचे मित्र सुरेश रक्ती, प्रज्ञावंत करमरकर यांच्यासह अनेकांची फसवणूक करण्यात आली होती. (Woman arrested cheating under pretext getting job)

फसवणूकीच्या या प्रकरणामध्ये राहत सय्यद हि मुख्य सुत्रधार होती. तरुणांना परदेशामध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून सय्यद व तिच्या साथीदारांकडून शहरातील अनेक तरुण-तरुणींची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राहत सय्यद हि सातत्याने राहण्याची ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देत होती. दरम्यान, वेगवेगळ्या ठिकाणी नावे बदलून ती वास्तव्य करीत होती. काही दिवसांपुर्वीच ती विमानगर परिसरात राहण्यास असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनीट एकचे पोलिस कर्मचारी अमोल पवार यांना मिळाली होती.

त्यानुसार, पोलिसांकडून तिच्या हालचालींवर पाळत ठेवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला संशयावरून ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केल्यानंतर तिने फसवणूकीच्या गुन्ह्याची कबुली दिली. सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शैलेश संखे, पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, तुषार माळवदकर, मीना पिंजण, रूखसाना नदाफ यांच्या पथकाने हि कामगिरी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. अजित पवार, उदयनराजे भोसले यांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT