Cyber Crime esakal
पुणे

Pune Cyber Crime : गंभीर गुन्ह्यात अटक होण्याची भीती दाखवून कॉम्प्युटर इंजिनिअर तरुणीची फसवणूक; घातला साडे बारा लाखांना गंडा

Pune Cyber Crime Marathi News : येवलेवाडी येथे राहणारी २९ वर्षीय तरुणी मगरपट्टा येथील कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. २८ ः संगणक अभियंता तरुणीस तिच्या आधारकार्डचा गैरवापर होत असल्याचे सांगत सायबर गुन्हेगारांनी तिच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रींग व अमली पदार्थ तस्करी सारखे गुन्हे दाखल असल्याचे सांगितले. तिला लवकरच पोलिसांकडून अटकही होऊ शकते, अशी भीतीही दाखवली. तरुणी आपल्या जाळ्यात अडकल्यानंतर गुन्हेगारांनी तिच्याकडील साडे 12 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

येवलेवाडी येथे राहणारी २९ वर्षीय तरुणी मगरपट्टा येथील कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहे. तरुणी मुळची उत्तराखंड येथील असून 2018 पासून ती नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्य करते. १६ मे रोजी तरुणीच्या मोबाईलवर इंटरनेट कॉल आला. तरुणीला समोरील व्यक्तीने तो पोलिस असल्याचे भासवून तरुणीच्या आधारकार्डचा गैरवापर होत असल्याचे सांगितले.

एक पार्सल मुंबईहून तैवानला पाठविले जात असून त्यासाठी तिच्या आधारकार्डचा वापर केला जात आहे. त्यानंतर त्याने तरुणीला सायबर क्राईमच्या उपनिरीक्षकासमवेत बोलण्यास सांगितले. उपनिरीक्षकाने तिच्याविरुद्ध विविध ठिकाणी मनी लॉन्ड्रींग व अमली पदार्थ तस्करीसारखे गुन्हे दाखल आहेत, तसेच पुढील तीन तासात तिला अटक होऊ शकते, अशी भीती दाखविली.

त्यानंतर त्याने तरुणीला स्काईप अॅप डाऊनलोड करण्यास सांगून त्याद्वारे व्हिडिओ कॉल केला. त्यानंतर त्यांनी तरुणीचे बँक खाते, विमा, बचत खाते अशा सर्व बँक व्यवहाराची माहिती घेणे बंधनकारक असल्याचे सांगीतले. तसेच तिच्या खात्यातील साडे 12 लाख रुपये घेतले. ते पैसे तपासानंतर मिळतील, असेही तिला सांगितले. दरम्यान, त्यांनी तरूणीकडे आणखी पैशाची मागणी केली, त्यावेळी तरुणीने तिच्या मित्राकडे पाच लाख रुपयांची मागितले. तरुणीची फसवणूक होत असल्याचे तिचा मित्र व तिच्या वडीलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले. त्यानंतर तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

"सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना भीती दाखवून त्यांची फसवणूक केली जात आहे. नागरिकांनी अशावेळी न घाबरता थेट पोलिसांशी संपर्क साधावा. त्यामुळे फसवणुकीचा धोका टाळता येऊ शकेल.' - मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे), कोंढवा पोलिस ठाणे.

अशी घ्या काळजी

- अनोळखी व्यक्तींना बॅंकेसंबंधी माहिती देऊ नका

- संशयास्पद फोन, मेसेज आल्यास कुटुंबीयांशी तत्काळ बोला

- पैशांची मागणी, भीती दाखविणे, धमकावल्यास पोलिसांशी संपर्क साधा

- अनोळखी फोन कॉल्स, व्यक्तींना ओटीपी सांगू नका

- गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींसमोर उघड करू नका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT