corona  
पुणे

पुण्यातून आली आजारी महिला आणि पुढे पहा काय घडले... 

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्‍यातील कदमवाकवस्ती येथे दोन दिवसांपूर्वी पुण्याहून उपचारासाठी आलेली एक 45 वर्षीय महिला कोरोनाबाधीत असल्याचे आढळून आले आहे.

संबंधित महिलेच्या संपर्कात तब्बल 27 जण आले आहेत. त्यामध्ये तिच्या दोन जावयांचा समावेश आहे. त्यामुळे कदमवाकवस्ती परिसरात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एकट्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत मागील चार दिवसात तब्बल चार जण कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे लोणी काळभोरसह पूर्व हवेलीत भीतीचे वातावरण पसरले आहे. 

पुण्यातील लोहियानगर परिसरात राहणारी एक महिला मागील आठ दिवसांपासून आजारी आहे. पुण्यात पुरेसे उपचार न मिळाल्याने ती कदमवाकवस्ती परिसरात राहणाऱ्या दोन जावयांकडे तीन दिवसांपूर्वी राहण्यास आली होती. दोन दिवसांपूर्वी तिच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे जावयांनी तिला फुरसुंगी मार्गावरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे तिची रक्त तपासणी व एक्‍सरे काढून पुढील उपचारासाठी हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, संबंधित रुग्णालयातील उपचार परवडणार नसल्याने तिला गोळीबार मैदान (पुणे) येथील शासकीय रुग्णालयात नेले. तेथे तपासणीत तिला कोरोनाची लागण झाली असल्याचे रविवारी (ता. 3) रात्री अकरा वाजता निष्पन्न झाले. 

संबंधित महिला कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न होताच कदमवाकवस्ती ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी महिलेचे जावई राहत असलेली वस्ती रविवारी (ता. 3) रात्री अकरा वाजता सील केली. तसेच वस्तीत निर्जंतुकीकरण केले. लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कात आलेल्या दोन जावायांना तत्काळ कोरोनाच्या तपासणीसाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात हलविले आहे. 

याबाबत डॉ. जाधव यांनी माहिती दिली की, संबंधित महिलेच्या संपर्कात तिच्या दोन जावायांसह तब्बल 27 जण आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास महिलेचा कोरोनाचा रिपोर्ट मिळताच तिला उपचारासाठी विविध रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या दोघांना तत्काळ कोरोनाच्या टेस्टसाठी हलविले आहे. उर्वरित पंचवीस जणांनाही आज (सोमवारी) दुपारी पुण्यात नेण्यात येणार आहे. महिलेचे जावई राहत असलेल्या परिसरात घरोघरी जाऊन आशा सेविकांच्या माध्यमातून माहिती घेतली जाणार आहे. 

पुणे शहरात मागील महिनाभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पुण्यात येणारे व जाणारे रस्ते मागील काही दिवसांपासून पूर्णपणे बंद केले आहेत. कवडीपाट टोलनाक्‍यावर हडपसर व लोणी काळभोर पोलिस डोळ्यात तेल घालून येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करत आहे. मात्र, तरीही महिला एवढ्या मोठ्या बंदोबस्ताचा अडथळा पार करून येथे पोहोचली कशी? हा सवाल उपस्थित होत आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT