dead_body 
पुणे

खेडमध्ये घर पडून महिलेचा मृत्यू, तीन जण जखमी

रुपेश बुट्टे

आंबेठाण (पुणे) : खेड तालुक्यातील वहागाव येथे आज झालेल्या चक्रीवादळाने घर पडून एक महिला मृत्यूमुखी पडली असून, तीन जण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. तसेच, शिवे येथे देखील जवळपास 40 घरांचे नुकसान झाले असून, 200 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. 

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील वहागाव येथे तानाजी अनंता नवले यांचे शेतात नव्याने घर बांधले आहे. यात ते एकत्रित कुटुंबासह राहत होते. आज झालेल्या वादळी पावसात या घरावरील छप्पर पुर्णपणे उडून गेले आहे. याशिवाय घराच्या भिंती देखील पडल्याने घर भुईसपाट झाले आहे. या घटनेत तानाजी नवले यांच्या आई मंजाबाई अनंता नवले (वय 65) यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच कुटुंबातील अन्य तीन जखमींना चाकण येथे खासगी दवाखान्यात पुढील उपचारासाठी हलविले आहे. जखमींमध्ये दोन भाऊ आणि एका मुलाचा समावेश आहे. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तहसीलदार सुचित्रा आमले यांनी घटनास्थळाला भेट देऊन मंडलाधिकारी राजेंद्र वाघ, तलाठी समीर शालीग्राम यांना पंचनामा करण्याच्या सूचना केल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, काळूराम पिंजण यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या भागात जाताना रस्त्यात मोठ्या प्रमाणात झाडे पडली असल्याने गावातील तरुणांनी ती बाजूला करण्याचा प्रयत्न केला, तर विजवाहक खांबांचे मोठे नुकसान झाले असून, तालुक्याच्या पश्चिम भागात जवळपास तीनशे ते चारशे विजवाहक खांब कोसळले आहेत. शिवे येथे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि आरोग्य उपकेंद्राच्या आवारात हलविण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

वराळे येथे विजेचे तीन लोखंडी खांब वाकले असून, काही प्रमाणात झाडे पडली आहेत. सावरदरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील झाडे पडली आहेत. शिवे येथील स्मशानभूमी शेड उडून गावठाण परिसरात पडले. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. शिंदे गावातील ठाकरवस्ती येथील वीजपुरवठा करणारे विद्युत जनित्र आहे. येथे काही ठिकाणी गुरांचे गोठे, पत्रा शेड, गाडी पार्किंग शेड, पॉलीहाउसचे मोठे नुकसान झाले आहे.
शिवे येथे देखील विजेचे खांब पडले असून, वाकीतर्फे वाडा येथे फळझाडांचे मोठे नुकसान झाले आहे. चाकण औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांना देखील या निसर्ग कोपाचा मोठा फटका बसला आहे. एमआयडीसीत बहुतांश ठिकाणी निर्माणाधीन असणाऱ्या शेड वरील पत्रे कागदाप्रमाणे हवेत फिरत होते
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Recruitment Youth Death : पोलिस भरतीवेळी धावताना सांगलीच्या 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; 1600 मीटरची 'ती' धाव ठरली शेवटची, खाकीचं स्वप्न उराशी, पण...

Multibagger Stock: पॉवर सेक्टरचा मल्टीबॅगर! 2 रुपयांचा शेअर पोहोचला 135 वर, अडीच वर्षांत 6,750% रिटर्न; गुंतवणूकदार झाले मालामाल

वधूच्या पाळीव कुत्र्याला वराच्या कुटुंबाकडून मारहाण; वातावरण तापलं अन् थेट लग्नच रद्द झालं, कुठं घडली घटना?

बायकोला कानाखाली मारणे क्रूरता नाही! हायकोर्टाचा धक्कादायक निकाल वादाच्या भोवऱ्यात; नेमकं प्रकरण काय?

HSC Exam : कुणी फोडली १२वीची केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका? नागपूर पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा, खासगी शिकवणीशी संबंध उघड

SCROLL FOR NEXT