Woman raped by Tempo Driver and cleaner in Pimpri 
पुणे

धक्कादायक! पिंपरीत टेम्पोचालक आणि क्लिनरने महिलेवर बलात्कार केला अन्..

विलास काटे

आळंदी : आयशर टेम्पो चालक आणि क्लिनरने मिळून गाडीत बसलेल्या महिलेवर बळजबरीने शारिरिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी (ता.११) मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास घडली. शिक्रापूरजवळील पेरणेफाटा येथे जाण्यासाठी महिलेस गाडीत बसविले आणि पिंपरी चिंचवड हद्दीत अत्याचार करून आरोपींनी सोडले. दोन्ही आरोपी 30 ते 40 वयोगटातील असून फरार असल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली.  

देशातच फिरताय ना? मग कोरोनाचं टेन्शन नको!

याबाबत पिडीत महिलेने बुधवारी (ता.११)तळेगाव दाभाडे येथे फिर्याद दिली होती. त्यानंतर गुन्हा रात्री उशीरा आळंदी पोलिस ठाण्याकडे वर्ग केल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली. पिडीत महिला एकोणतिस वर्षाची आहे. तर आरोपी दोघेही अनोळखी आहेत.

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बुधवारी(ता.११) मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पिडीत महिलेस आळंदीतीन पेरणेफाटा येथे जायचे होते. मात्र, आरोपींनी तीस आयशर टेम्पोमध्ये बसवून गाडी थेट पेरणेफाटा येथे नेण्याऐवजी पिंपरीचिंचवड भागात आणली आणि तीच्यावर गाडीतच बळजबरी अत्याचार केला. त्यानंतर पिडीत महिलेस आरोपींनी शिविगाळ आणि मारहाणही केली. यावेळी पिडीतेने स्वताची कशीबसी सुटका करत स्वत:ची पर्स, आणि क्लिनरचा मोबाईल घेवून गाडीतून उडी मारून त्यांच्या तावडीतून सूटका करून पळाली. त्यानंतर एका इमारतीच्या वॉचमनच्या साहाय्याने पोलिस ठाणे गाठले.

नोकरी गेल्यामुळं तरुणावर आली चोरीची वेळ; पुण्यातला धक्कादायक प्रकार
यावेळी सुरूवातीला तळेगाव दाभाडे येथे गुन्हा दाखल करून आळंदी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. यातील दोन्ही आरोपी फरार असून अधिक तपास आळंदी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरिक्षक अजय लोहेकर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: पर्यटकांचा हिरमोड! देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हिणी घाट बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

Pune Property Tax : पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली: पहिल्या तिमाहीत १३९५ कोटी, गेल्या वर्षीपेक्षा १०२ कोटींची वाढ

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

SCROLL FOR NEXT