a Woman Suicide due to tired of torture by son and Daughter In law 
पुणे

मुलगाच ठरला आईसाठी वैरी; अखेर त्या माऊलीने संपविले...

सकाळ वृत्तसेवा

उरुळी कांचन(पुणे) : सांभाळ करत नसल्याबाबत पोलिसांत दिलेली तक्रार मागे घ्यावी, यासाठी मुलगा व सुनेकडून होणाऱ्या छळाला कंटाळून उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ज्येष्ठ महिलेने मुलाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 


पुणे :..अन् रिक्षाचालकाने अनुभवले वर्दीतील 'देवदूत'

हा प्रकार सहा दिवसांपूर्वी घडला. या प्रकरणी महिलेच्या मुलीने शनिवारी (ता. 4) पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आत्महत्येचे कारण पुढे आले. इंदूबाई जगन्नाथ कुदळे (वय 65, रा. उरुळी कांचन, ता. हवेली, मूळ गाव रानमळा, ता. पुरंदर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची मुलगी कल्पना दिलीप झगडे (रा. शिर्सुफळ, ता. बारामती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लोणी काळभोर पोलिसांनी महिलेचा मुलगा विकास व त्याची पत्नी रूपाली ऊर्फ सायली यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने दिली...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षांपूर्वी विकासच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर इंदूबाई विकासकडे राहण्यास आल्या होत्या. उरुळी कांचन येथे फ्लॅट घेण्यासाठी विकास व रूपाली यांनी इंदूबाईंकडून पोस्टातील काही रक्कम व सोन्याचे दागिने मागून घेतले होते. मात्र फ्लॅट नावावर होताच ते इंदूबाईंना त्रास देऊ लागले होते. त्रासाला कंटाळून इंदूबाईंनी त्यांच्याकडे पैसे व दागिने परत मागण्यास सुरुवात केली होती. नातेवाइकांच्या मध्यस्थीनंतरही आईला त्रास देणे सुरूच राहिले. तीन महिन्यांपूर्वी इंदूबाईंच्या तक्रारीवरून मुलगा व सुनेविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा मागे घ्यावा, यासाठी पुन्हा दोघांनी त्रास देण्यास सुरुवात केली होती. विकास व त्याच्या पत्नीने 28 डिसेंबरला इंदूबाईंना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यातूनच इंदूबाईंनी 30 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास आत्महत्या केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : कमी दाबाचा पट्टा सक्रिय पण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार; पुढच्या चार दिवसांचा हवामान अंदाज असा

Ashadhi Ekadashi 2026 Marathi Wishes: "अवघा रंग एक झाला..." आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT