satgaon.jpg 
पुणे

अरे वा ! पुण्यातील 'या' भागात महिलांना मिळतोय हक्काचा रोजगार

जयदीप हिरवे
सातगाव पठार (पुणे) : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात शेतीची विविध कामे चालू आहेत. ही कामे करण्यासाठी शेतकरी महिला मजूरांना पसंती देत आहेत. तसेच कोरोनाच्या काळात हाताला रोजगार उपलब्ध होत असल्याने महिला देखील शेतांमध्ये कामासाठी जात असल्याने त्यांना हा एक प्रकारचा हक्काचा रोजगार उपलब्ध होत आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सातगाव पठार परिसरात शेतकऱ्यांनी बटाटा पिकाबरोबरच भईमुग, वटाणा, फरशी आदी विविधे पिक घेतली आहेत. वटाणा पिकाची सध्या तोडणी चालू असून वटाण्याने शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून दिले आहेत. भुइर्मुग पीक देखील चांगलेच बहरात आले आहे. सध्या पठार भागात पाऊस सारखाच कमी जास्त प्रमाणावर चालू आहे. त्यामुळे भुईमुगात अनावश्यक तण, गवत जादा प्रमाणावर उगवले आहे. हे अनावश्यक उगवलेले तण, गवत काढूण टाकण्यासाठी शेतकऱ्यांनी आता सुरवात केली आहे. या कामासाठी महिला मजूरांची सहज उपलब्धता होत असल्याने शेतकरी महिला वर्गास कामासाठी प्राधान्य देत आहेत. तसेच वटाणा तोडणीची देखिल कामे काही शेतांमध्ये चालू आहेत.
कोरोनाच्या काळात महिला वर्गाच्या हातालादेखील दुसरे कोणतेच काम नसल्याकारणाने महिला देखील शेतांमध्ये काम करण्यास जात आहेत. त्यामुळे महिलांना एक प्रकारे हक्काचा रोजगारच मिळाला आहे. शेतामध्ये काम करत असताना आम्ही मास्क लावूनच काम करतो. सोशल डिस्टन्सींग देखील पाळतो. शेतात एक दिवस काम केल्यानंतर रोज म्हणून 200 रूपये हजेरी दिली जाते. कोरोनाच्या काळात आम्हाला मिळत असलेली ही रक्कम आमच्यासाठी खूपच मोठी असल्याचे पेठ (ता. आंबेगाव ) येथील संगीता ठाकरे पवळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Talegaon Dhamdhere News : सह हिस्सेदारांच्या संमतीची अट अन्यायकारक; तळेगावात दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे काम ठप्प

नोव्हेंबरमध्ये या ५ राशींवर महालक्ष्मीची विशेष कृपा! पैशांचा पाऊस पडणार, मोठ्या धनलाभासह मिळणार अनेक फायदे

Maharashtra Live News: ‘बार्टी’, ‘सारथी’ला पूर्णवेळ प्रमुख देण्याची मागणी

GIFT City Investment: ‘गिफ्ट सिटी’ : गुंतवणुकीचा नवा मार्ग

Piyush Goyal : दीडशे वर्षांपासून जपलेली भारताशी नाळ; आता विकासगाथेत सहभागी व्हा; सुरिनाममार्गे नेदरलॅंड्समध्ये आलेल्या भारतीय समुदायाला गोयल यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT