पुणे

नऊवारी नेसून रणरागिणींची बारामती-पंढरपूर सायकल सफर

मिलिंद संगई

बारामती : येथील बारामती सायकल क्लबच्या महिला सदस्यांनी नुकताच रविवार (ता. 17 ) बारामती ते पंढरपूर असा 111 किमी सायकलप्रवास केला. यातही वैशिष्टय म्हणजे या सर्वांनी नऊवारी साडी घालून हा सायकल प्रवास केला. अकरा वर्षांच्या मुलीपासून साठ वर्षीय महिलांनी मोठ्या उत्साहाने या सायकल प्रवासात सहभाग घेतला. 

दरम्यान, या सायकल रॅलीमध्ये लता विजय दराडे, श्रध्दा विजय दराडे, जान्हवी नीलेश घोडके, ऋतुजा राजेंद्र भुंजे, शुभश्री सुभाष चौधर, मंगल राऊत, रुपाली विनायक तारु, साक्षी विनायक तारु, समीक्षा विनायक तारु, अनुष्का राऊत, अंकिता मुकुंद जाधव, द्वारका कैलास कारंडे, अनिता आटोळे यांनी सहभाग नोंदविला.

या महिला सदस्यांना पाठिंबा देण्यासाठी विजय संभाजी दराडे, मच्छिंद्र आटोळे, सुभाष चौधर, श्रेयस विजय दराडे, कैलास कारंडे, रावबा गवंड आदी सहभागी झाले होते. 

रविवारी पहाटे पाच वाजता बारामतीतील भिगवण चौकातून प्रारंभ झालेली ही रॅली गोखळी-बरड-नातेपुते-माळशिरस-वेळापूर मार्गे पंढरपूरपर्यंत गेली. दुपारी दोन वाजता रॅली पंढरपूरला पोहोचली. प्रवासात अनेक ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत केले. 

पंढरपूर येथील आमदार परिचारक कुटुंबाकडून या महिलांचा सत्कार करण्यात आला. या सायकल रॅलीची प्रेरणा बारामती सायकल क्लबच्या लता विजय दराडे आणि श्रद्धा विजय दराडे या माय-लेकींनी एक जानेवारी रोजी बारामती-आळंदी पूर्ण केलेल्या सायकल सफरीतून मिळालेली होती. दरम्यान या पुढील काळातही महिलांच्या सायकल सफरींचे आयोजन केले जाणार आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुणे पोलिसांच्या रडारवरील 'बबलू' कोण? इन्स्टाग्रामवर फोटो टाकायचा, अन् गुपचूप चालायचा पिस्तुलांचा धंदा; अखेर पकडला

Vaibhav Sooryavanshi पर्यंत रघूनं पोहचवली टीम इंडियाची जर्सी, १५ वर्षांच्या पोराची कशी होती रिऍक्शन? BCCI ने शेअर केला Video

Samruddhi Mahamarg Accident : फॉर्च्युनर सळ्यांच्या कंटेनरला मागून धडकली; डॉक्टर पतीसह पत्नीचा मृत्यू, मुलांसह तिघे जखमी

कोण आहेत जॉर्ज कुरियन? केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? कारण आलं समोर

Power Supply Restoration: शेतकऱ्यांना दिलासा! उपसा सिंचन बंदी २६ जूनपर्यंत शिथिल; महावितरणला वीज कनेक्शन तत्काळ चालू करण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT