पुणे

महाराष्ट्रातील महिला गिर्यारोहकांनी कांगयात्से शिखरावरील मोहीम केली यशस्वी

गिरिप्रेमीच्या महिला गिर्यारोहण संघाने लेह-लडाखमधील कांगयात्से १ व २ शिखराची दुहेरी मोहीम नुकतीच यशस्वीपणे पूर्ण करून महाराष्ट्रातील गिर्यारोहणाचा नवा अध्याय रचला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गिरिप्रेमीच्या महिला गिर्यारोहण (Women Climbers) संघाने लेह-लडाखमधील कांगयात्से १ व २ शिखराची (Kangyatse Peak) दुहेरी मोहीम (Campaign) नुकतीच यशस्वीपणे पूर्ण करून महाराष्ट्रातील (Maharashtra) गिर्यारोहणाचा नवा अध्याय रचला आहे. तब्बल तीन दशकांनंतर महाराष्ट्रातील केवळ महिला गिर्यारोहक संघाने हिमालयात (Himalaya) मोहीम आयोजित केली होती. या दुहेरी मोहिमेसाठी श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी या संघाचे मार्गदर्शन केले होते.

या मोहिमेच्या एका संघातील प्रियांका चिंचोरकर, स्मिता करिवडीकर व प्रशिक्षक समीरन कोल्हे यांनी ‘कांगयात्से-१’ या सहा हजार ४९४ मीटर उंच शिखरावर प्रतिकूल हवामानात २ ऑगस्ट रोजी यशस्वी चढाई करून तिरंगा फडकविला. तर, मोहिमेतील दुसऱ्या संघातील पद्मजा धानवी, स्नेहा गुडे, अंजली कात्रे व सायली बुधकर यांनी सहा हजार २७० मीटर उंच ‘कांगयात्से-२’ या शिखरावर मोहीम यशस्वी केली. यातील अंजली कात्रे या ५१ वर्षांच्या असून जिद्द, चिकाटी व संयम असेल तर पन्नाशीतही गिर्यारोहण मोहिमा यशस्वी करता येतात, हे दाखवून दिले. या दुहेरी मोहिमेला मिंगमा शेर्पा, संजीय राय, मिंग तेम्बा शेर्पा व सनी शर्मा या ‘हाय अल्टिट्यूड गाईड्स’ने सहकार्य केले.

गिरिप्रेमीच्या संस्थापिका-अध्यक्षा उषःप्रभा म्हणाल्या, ‘‘या मोहिमेच्या यशामुळे महिलांच्या सांघिक मोहिमांना फार चांगली सुरवात झाली आहे. आता दरवर्षी महिलांच्या संघाला मोहिमांवर पाठविण्यात आले पाहिजे. गिरीप्रेमीतर्फे महिलांच्या अशा प्रकारच्या मोहिमेचे आयोजन केल्यामुळे एक मोठा टप्पा गाठला गेला याचा आनंद आहे. आता महिलांनी सह्याद्री, हिमालयातील लहान, पण तांत्रिकदृष्ट्या अवघड शिखरांच्या मोहिमा कराव्यात. तसेच ट्रान्स हिमालयन ट्रेकचे आव्हान पेलणे हे त्यांचे ध्येय असले पाहिजे.’’

कांगयात्से १ आणि २ बाबत

- कांगयात्से-१ हे शिखर तांत्रिकदृष्ट्या चढाईसाठी तुलनेने अवघड

-चढाई मार्गावरील दगड घट्ट नाहीत

- यातील कॅम्प-२ ते शिखरमाथा ही चढाई सुमारे ५५० मीटर आहे

- बर्फाच्या भिंती पाठोपाठ असल्यामुळे त्या पार करताना कस लागतो

- साधारण ७० ते ८० अंश कोन आणि ५० ते १०० मीटर उंची असलेल्या १५ ते २० भिंती आहेत

- शेवटच्या टप्प्यात छुप्या हिमभेगा आहेत

‘गिर्यारोहक महिलांचा एक संघ म्हणून तब्बल २८ वर्षानंतर पहिल्यांदाच ही सांघिक मोहिम यशस्वी झाली आहे. मोहिमेची घोषणा केल्यानंतर काही महिन्यांत कोरोनाचे सावट पसरले. अशावेळी संघ म्हणून एकत्र येऊन तयारी करून दुहेरी मोहिमेसाठी संघटित होण्यासाठी ऑनलाइन माध्यमातून गुरुकुल पद्धत राबविण्यात आली. एक वर्ष या महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. २०१२च्या एव्हरेस्ट नागरी मोहिमेसाठी आम्ही हा प्रयोग राबविला होता. कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर काही छोट्या मोहिमा आयोजित केल्या. यात तैलबैलाच्या दोन्ही भिंतीवरील चढाई, ड्युक्स नोज, सिंहगडाचे कडे अशा सहा ते सात मोहिमांचा समावेश होता. गुरुकुलचाच भाग असलेला महिला गिर्यारोहकांचा आणखी एक संघ येत्या सप्टेंबर महिन्यात भारतीय हिमालयातील ‘मंदा-१’ या शिखरावर मोहिमेसाठी जाणार आहे.’’

- ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे (महिला संघाचे मार्गदर्शक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"BJP अन् काँग्रेसवाले मले हलक्यात घेते होते, आता विधानसभा लढवणार! पोट्ट्यांनी ठरवलं..."; कराळे मास्तरांचा थेट इशारा

Pune Roadwork: खोदकामामुळे जुन्या वृक्षांना धोका; पाषाण-सूस रस्त्यावरील स्थिती, कंत्राटदाराचा निष्काळजीपणा, मुळ्या पडल्या उघड्या

Pune News: मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पात निकृष्ट काम; ठेकेदाराचा खुलासा पुणे महापालिकेने फेटाळला

Latest Marathi News Update : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Madha Politics: माढ्याची खासदारकी राष्ट्रवादीला सोपी! पदवीधरच्या निकालाचा परिणाम; दोन आमदार पक्षासोबत तर दोन भाजपच्या जवळ

SCROLL FOR NEXT