पुणे

..तर महिलांचा संशोधनातील सहभाग वाढेल 

सकाळवृत्तसेवा

पुणे -  संशोधन क्षेत्रात पुरुषांबरोबरच महिलांचेही योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. "महिला व मुली यांचा विज्ञानातील सहभागाचा आंतरराष्ट्रीय दिन'निमित्त (ता. 11) महिलांना संशोधन क्षेत्रात असणारी संधी, त्यातील योगदान याबाबत महिला संशोधक, शास्त्रज्ञांची साधलेला हा संवाद. 

संशोधन क्षेत्रात महिला स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करू पाहत आहेत. महाविद्यालयात अध्यापनाचे काम करताना त्यांच्या संशोधनाचा परीघ दिवसेंदिवस विस्तारत आहे. डॉ. अनामिका विठ्ठल कदम हे त्यातीलच एक महत्त्वाचे नाव. त्यांनी संशोधन क्षेत्रात महिला मागे नाहीत, हे दाखवून दिले आहे. मूळच्या मुंबईच्या असणाऱ्या डॉ. कदम यांनी राष्ट्रीय स्तरावर बारा, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 28 संशोधन पेपर सादर केले आहेत. इलेक्‍ट्रोक्रोमिक प्रॉपर्टीज, गॅस सेन्सर, सुपर कपॅसिटर, ऑर्गेनिक- इनऑर्गेनिक नॅनोकंपोझिट मटेरियल, सोलर सेल, इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अशा वैविध्यपूर्ण विषयांशी निगडित त्यांचे संशोधन आहे.

डॉ. कदम म्हणाल्या, ""महिलांना संशोधन क्षेत्रात संधी मिळाली तर त्या खूप काही करू शकतात. त्यांच्यातील संशोधक वृत्तीला शालेय व महाविद्यालयीन जीवनात आकार देणे आवश्‍यक आहे. योग्य मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहिले, तर त्यांचा संशोधन क्षेत्रातील सहभागही नक्कीच वाढेल.'' 

राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्रातून (एनसीसीएस) निवृत्त झालेल्या शास्त्रज्ञ डॉ. ललिता लिमये म्हणाल्या, ""संशोधन क्षेत्रात सध्या मुला-मुलींचे सम प्रमाण दिसते. पीएच.डी. करून परदेशांत गेलेले आता पुन्हा भारतात येत असून, त्यांचे प्रमाण वाढत आहे. संशोधन क्षेत्रात सातत्याने पाठपुरावा करणे, शोध घेण्याची वृत्ती, संयम असणे आवश्‍यक असते. संशोधनासाठी बराच वेळ द्यावा लागत असल्याने कुटुंबाचा पाठिंबा असणेही तितकेच गरजेचे असते. पुण्यात काश्‍मीर, ईशान्य भारत, ओरिसा अशा विविध भागांतून विद्यार्थी संशोधनासाठी येत आहेत.'' 

नागरिकांना विज्ञानाची गोडी लागावी, त्यातील क्‍लिष्ट गोष्टी समजाव्यात म्हणून त्यावर आधारित कविता, कथा, लेख लिहून साहित्यातून विज्ञानाची अनोखी ओळख करून देण्याचा प्रयत्न डॉ. दिप्ती सिधये करत आहेत. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील साहाय्यक प्राध्यापिका आहेत. त्या म्हणाल्या, ""विज्ञान हा किचकट वाटणारा विषय म्हणून त्याच्याकडे न वळता व्यावसायिक शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जाते. मात्र, असे असले तरी विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला त्याची आवडच असावी लागते. विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी इंटरनेटचा वापर करून मुलांनी प्रयोग करून पाहण्याची आवश्‍यकता आहे. त्यासोबतच पुस्तकेही वाचणे गरजेचे आहे.'' 
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT