पुणे

#MeToo कष्टकरी महिला दबावाखालीच

पांडुरंग सरोदे

पुणे - कागद-काच-पत्रा वेचणाऱ्या एका महिलेस तिच्या कामाशी निगडित असलेल्या एका व्यक्तीकडून रात्री-अपरात्री फोन करून त्रास दिला जात होता, त्याच्याकडून सातत्याने असभ्य वर्तन केले जात होते. या शोषणास कंटाळून संबंधित महिलेने स्वतःच पुढाकार घेऊन प्रतिकार केला अन्‌ तिचा त्रास थांबला... एकीकडे उच्चभ्रू, मध्यमवर्गीय महिलांची #MeToo चळवळ जोर धरू लागलेली असताना असंघटित क्षेत्रातील कष्टकरी महिला मात्र लैंगिक शोषणाच्या बळी ठरत आहेत अन् त्यांचा आवाजही दाबला जात आहे. 

खाणावळीमध्ये काम करणाऱ्या महिलेपासून ते कागद-काच-पत्रावेचक महिला, मोलकरीण, बांधकाम मजूर, सफाई कर्मचारी यांसारख्या विविध प्रकारची कामे करणाऱ्या महिला लैंगिक शोषणाच्या बळी ठरत आहेत. काही धाडसी महिला वगळता उर्वरित महिलांवर धनदांडग्या व्यक्ती, पोलिस, स्थानिक गुंड, राजकीय व्यक्तींकडून दबाव टाकण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे.   

वस्त्यांमधील महिला, युवतींसाठी काम करणाऱ्या ‘सम्यक’ संस्थेचे प्रमुख आनंद पवार म्हणाले, ‘‘सरकारी व खासगी क्षेत्रामध्ये कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरोधी कायद्याअंतर्गत समिती कार्यरत असते. त्यामुळे तेथे काही प्रमाणात वचक असतो; परंतु सार्वजनिक, असंघटित क्षेत्रातील कष्टकरी महिलांचे लैंगिक शोषण होऊनही त्यांचा आवाज दाबला जातो. आमच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांशी काही महिला याबाबत बोलतात.’’

पत्नी बाळंतपणासाठी गावी गेल्यानंतर पतीने घरकाम करणाऱ्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने संबंधित व्यक्तीला खडसावून ते काम सोडले. कष्टकरी महिलांचे कामाच्या ठिकाणी शोषण होते, परंतु काम जाण्याच्या भीतीपोटी त्या बोलत नाहीत. कोर्ट, पोलिसबाजी त्यांना परवडणारी नसते. मात्र कुटुंब, संघटना त्यांना पाठबळ देते. 
- मेधा थत्ते, श्रमिक महिला मोर्चा

कागद-काच-पत्रा वेचणाऱ्या महिलेस एका व्यक्तीकडून त्रास दिला जात होता. बांधकाम महिला मजूर अशा त्रासाला कंटाळून काम सोडतात. असंघटित क्षेत्रात कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अत्याचाराची दखल घेण्यासाठी समिती नसते. त्यातच महिलांवर दबाव टाकून प्रकरण दाबले जाते. मात्र, त्यानंतरही काही महिला लढतात.
- पूर्णिमा चिकरमाने, कागद-काच-पत्रा संघटना  

एका अधिकाऱ्याने बांधकाम मजूर महिलेचे लैंगिक शोषण केले होते. कष्टकरी महिलांनाही हा त्रास होतो. मात्र, त्या आवाज उठवितात; पण त्याला प्रतिष्ठा नसते. याउलट उच्चभ्रू, प्रतिष्ठितांमध्ये हा आवाज दाबला जातो.
- नितीन पवार, सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT