पुणे

घरकामगार महिलांना मिळणार अर्थसाहाय्य; पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेतून मदतीचा हात

सकाळवृत्तसेवा

पुणे - गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये स्वयंपाक, धुणी-भांडी, स्वच्छता, झाडू आदी कामे करणाऱ्या महिला आणि चालकांना पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेतून आर्थिक साहाय्य केले जाणार आहे. यामुळे या कामगारांना दिलासा मिळणार आहे. 

जिल्ह्यातील असंघटित कामगारांची माहिती श्रम मंत्रालय आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मागवली आहे. गृहनिर्माण संस्थांनी घरातील स्वयंपाक, धुणी-भांडी, स्वच्छता, झाडू काम करणाऱ्या तसेच वाहनचालक या सर्व कामगारांची माहिती 4 एप्रिलपर्यंत विहित नमुन्यात द्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष आणि सचिवांना केले आहे. 

हे अर्थसाहाय्य नेमके किती व केव्हापासून मिळणार आहे, हे केंद्र सरकारने अद्याप स्पष्ट केलेले नाही. पहिल्या टप्प्यात गृहनिर्माण सोसायट्यांकडून ही माहिती गोळा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सहकार विभागातील सूत्रांनी सांगितले. 

येथे पाठवा माहिती 
dculo-mh@gov.in 
ddrcspune@gmail.com किंवा punefed@gmail.com या इ-मेल वर ही माहिती पाठवावी. 

विहित नमुन्यातील भरावयाची माहिती 
- गृहनिर्माण सोसायटीचे नाव, पूर्ण पत्ता पिनकोडसह, नोंदणी क्रमांक 
- सोसायटीमधील एकूण सदनिका 
- धुणी-भांडी, स्वच्छता, झाडू काम आणि चालक या कामगारांची नावे 
- कामगारांचे आधार कार्ड क्रमांक, जन्मतारीख, रेशन कार्डचा प्रकार (पिवळे, केशरी), रेशन कार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक 
- गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष किंवा सचिवांचे नाव, मोबाईल क्रमांक आणि इ-मेल आयडी 


अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 
सुहास पटवर्धन (अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ) 9422004701 

मदतीचे आवाहन 
आपत्कालीन परिस्थितीत गृहनिर्माण संस्थांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी आर्थिक साहाय्य करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे. 

"सहकार दरबार' बंद राहणार 
पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे कार्यालय आणि "सहकार दरबार' 14 एप्रिलपर्यंत बंद राहील, अशी माहिती पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

SCROLL FOR NEXT