कांदलगावात "साऊ-जिजाऊ"च्या लेकींनी घेतली स्वच्छतेची शपथ sakal
पुणे

कांदलगावात "साऊ-जिजाऊ"च्या लेकींनी घेतली स्वच्छतेची शपथ

महिला बचतगट उत्पादनास बाजारपेठ मिळवून देणार; सरपंच रविंद्र पाटील

डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : कांदलगाव ( ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त साऊ जिजाऊ च्या लेकींनी स्वच्छतेतून समृद्धीची शपथ घेतली. गावातील महिला बचत गट उत्पादित मालास बाजारपेठ मिळवून देवूअशी ग्वाही सरपंच रविंद्र पाटील यांनी दिली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच रविंद्र पाटील, उपसरपंच तेजमाला बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या कमल राखुंडे,कोंडाबाई जाधव, रेखा बाबर, किसन सरडे, विजय सोनवणे,उल्हास पाटील,दशरथ बाबर,महेश धुमाळ, हनुमंत चव्हाण, गावसमन्वयक निलोफर पठाण उपस्थित होते. यावेळी ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. गावातील महिला बचतगटांनी बनवलेले पदार्थ सरपंच रविंद्र पाटील यांना भेट देण्यात आले.

सरपंच रविंद्र पाटील पुढे म्हणाले,कांदलगावा तील महिलांनी चालू केलेल्या व्यवसायाला जास्तीत जास्त बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करत आहे. इंदापूर येथील "साऊ-जिजाऊ" घरकुल मार्ट येथे हे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. सद्यस्थितीला कांदलगावातील महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर झाल्या असून त्यांना सक्षम केले जाईल."खेड्याकडे चला" हा गांधीजीचा हेतु बचतगट चळवळीतून नक्कीच साध्य होईल.

यावेळी विद्या सोनवणे,मुनेरा नायकुडे,स्वाती ननवरे,लक्ष्मी कसबे,फातीमा शेख,दिपाली कांरडे,माधवी काशिद,रेणुका काशीद,शालन सोनवणे,दमयंती राऊत,द्रौपदी जगदाळे,विद्या सरडे या बचतगट महिलांनी बनवलेले पदार्थ व वस्तूंचे सादरीकरण केले. सूत्रसंचालन ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी तर आभार पांडुरंग इंगळे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT