पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी कॅस (करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम) अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या मुलाखती पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसांत ‘कॅस’चे कामकाज पूर्ण न झाल्यास विद्यापीठाच्या ९ आणि १० जानेवारी रोजी होणाऱ्या अधिसभेसमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेने (स्पुक्टो) दिला आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
विद्यापीठातर्फे मार्च-२०२० मध्ये संलग्न महाविद्यालयांतील सहयोगी प्राध्यापकांच्या ‘कॅस’च्या मुलाखती घेतल्या जाणार होत्या; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मुलाखतींना स्थगित देण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मुलाखती घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, अंतिम वर्षाच्या परीक्षांचे काम आणि लॉकडाउनमुळे प्रवासावर येणाऱ्या बंधनामुळे त्यावेळीही ‘कॅस’च्या मुलाखती स्थगित केल्या. त्यानंतर विद्यापीठाने २२ ते २८ डिसेंबर दरम्यान ४८४ प्राध्यापकांच्या मुलाखती घेतल्या जातील, असे स्पष्ट केले होते; परंतु पुन्हा एकदा विद्यापीठाने मुलाखती पुढे ढकलल्या.
विद्यापीठाकडून वारंवार प्राध्यापकांच्या मुलाखती पुढे ढकलल्या जात असल्याने अध्यापक संघटनेतर्फे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त केली. ८ जानेवारीपर्यंत कॅसची प्रक्रिया पूर्ण न केल्यास अधिसभेसमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.
प्राध्यापकांच्या ‘कॅस’बाबत शासनाने आदेश दिले असताना विद्यापीठाकडून प्राध्यापकांच्या मुलाखती वारंवार रद्द केल्या जात आहेत. त्यामुळे प्राध्यापक संघटनेच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
- प्रा. एस. पी. लवांडे, सचिव, स्पुक्टो
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.