Work from Home Article by sudhir Gaikwad 
पुणे

वर्क फॉर्म होम की ऑफिस : नक्की काय योग्य?

सुधीर गायकवाड

कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे आता ज्या सेक्टरमध्ये कर्मचाऱ्यांना घरून काम करणे शक्य आहे, त्यांना वर्क फॉर्म होमची मुभा देण्यात आली आहे. 



ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या या कामाच्या पद्धतीची पुढील काळात प्रभावी अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. कारण देशातील मोठ्या कंपन्यांनी यापुढे 40 हे 70 टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम या योजनेअंतर्गत काम करण्यास प्रवृत्त करणार आहेत. त्यांचा कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होण्याची शक्यता आहे. कर्मचारी घरूनच काम करणार असल्याने कंपन्यांना ऑफिसची गरज कमी प्रमाणात लागेल. त्यामुळे त्यांचा ऑफिससाठी लागणार भाड्याचा किंवा बांधकामाचा निश्चित खर्च कमी होईल. तसेच इमारतीची देखभाल दुरुस्ती आणि विजबिलातून मुक्तता होईल. कंपन्यांना कर्मचार्‍यांवर करावा लागणारा ब्रेकप कॅफेटेरिया आणि वाहतूक खर्चाची मोठ्या प्रमाणावर बचत करता येईल. खर्च कमी झाल्यामुळे कंपन्यांच्या नफ्यामध्ये चांगली वाढ होईल. पण आपल्याला आणखी काही गोष्टींचा विचार करायला हवा. विदेशी कंपन्यांनी बिझनेस आउटसोर्सिंग तत्वाखाली भारतीय आयटी कंपन्यांना बिझनेस दिला आहे. असे करत असताना त्यांनी काही अटी-शर्ती घातलेल्या असतात. त्यांची पूर्तता न झाल्यास व्यवसाय करार रद्द होऊ शकतो. करार करताना भारतीय कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम या अंतर्गत करार केला असण्याची शक्यता फार कमी आहे. सध्याच्या परिस्तितीत या कंपन्यानी भारतीय कंपन्याना वर्क फ्रॉम होम काम चालू ठेवण्यासाठी होकार दिला असेल पण हे कायम स्वरूपी चालने कठिण आहे. आयटी कंपन्या खुप मोठ्या प्रमाणात सेन्सिटिव्ह डेटा हाताळतात आणि त्या बाबातीत खूप बिजनेस प्रोटोकॉल असतात. वर्क फ्रॉम होम करत असताना या बाबींची पूर्तता कशी होणार हा गहण प्रश्न आहे. 

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम हा पर्याय असणार आहे की घरून काम करणे बंधनकारक हे काही दिवसांनी स्पष्ट होईल. कर्मचारी या नवीन काम करण्याच्या पद्धतीला कसा प्रतिसाद देतात हे पाहायला हवं. एकूणच आपल्याकडील इंटरनेट, सुख- सुविधा आणि इतर आवश्यक बाबींची तयारी अपूर्ण आहे. ते तयार होण्यास अजून बराच कालावधी जाईल. भारतीय एकत्र कुटुंब संस्कृतीत विश्वास ठेवतात. त्यामुळे प्रत्येक घरी साधारणत: चार ते सहा सदस्य असतात. हा नवीन ट्रेंडमुळे प्रत्यक्षात  अंमलात आणण्यासाठी अनेक अडचणी असतील. या नवीन ट्रेंडमुळे लोकांसाठी अधिक व्यवसायाच्या संधी येऊ शकतात आणि जागतिक रोजगाराची प्रवृत्ती सुरू होऊ शकते. परंतु आपल्या देशातील अविकसित पायाभूत सुविधांमुळे आम्हाला अधिक वेळ लागू शकेल. तोपर्यंत आम्हाला ऑफिसमधून काम चालूच ठेवावं लागेल. भारतीय एकत्र कुटुंब पद्धती, आपली मानसिकता आणि सामाजिक गरजा पाहता कामांची ही नवीन पध्दत सहज पचनी पडेल असं वाटत नाही.

( लेखक ब्लॅक टोपाझचे व्यवस्थापकीय संचालक,आहेत)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT