pune university square traffic Sakal
पुणे

Pune | विद्यापीठ पुलाचे काम नियोजनानुसार सुरू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (Hinjewadi to Shivajinagar Metro) प्रकल्पाचे काम ठरलेल्या नियोजनानुसार सुरू आहे. सध्या हिंजवडी, बाणेर, इक्वेअर, यशदा या चार ठिकाणी काम सुरू आहे. विद्यापीठ (University) चौकाच्या परिसरात भूसंपादनाचे काम सुरू आहे, असे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (PMRDA) स्पष्ट केले आहे.

पीएमआरडीतर्फे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम करताना विद्यापीठ चौकात उड्डाणपूल व इतर वाहतूक सुधारणा केल्या जाणार आहे. मात्र, विद्यापीठ चौकात या कामाला गती नसल्याबद्दल नागरिकांनी सोशल मिडियावर प्रश्‍न उपस्थित केले. त्याबाबत पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. विद्यापीठ चौकात उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी दोन्ही बाजूने रुंदीकरण करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर उड्डाणपुलाचे पिलर टाकण्याचे काम करता येईल. वैकुंठ मेहता संस्थेच्या बाजूचे काम झाले असून, मॉडर्न महाविद्यालयाच्या बाजूचे काम सुरू आहे.

बाणेर, हिंजवडी, इक्वेअर, यशदा असा चार ठिकाणावरून काम सुरू आहे. अलाईनमेंटमध्ये कोणताही बदल नाही. हळूहळू प्रत्यक्षात काम दिसण्यास सुरवात होईल. प्रत्यक्षात काम दिसत नसले म्हणजे काम बंद झाले असे नाही तर इतर अनेक पूरक कामे सुरू आहेत, असे दिवसे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

''भारत शांततेवर विश्वास ठेवतो, पण...''; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मूंचं देशवासीयांना संबोधन

SCROLL FOR NEXT