वाघोली (पुणे) : वाघोली ते शिक्रापूर दरम्यान सहा पदरीकरण कामाला लॉकडाऊननंतर आता वाघोली पासून पुन्हा सुरुवात झाली आहे. दरम्यान या कामात अडथळा ठरणारे बुजलेले ओढे नाले खुले करण्याच्या कामास वाघोली ग्रामपंचायतीने सुरुवात केली आहे. अॅन्युईटी अंतर्गत वाघोली ते शिक्रापूरपर्यंत सहा पदरी करण्यात येणार आहे. यासाठी २२२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रयत्नांतून या कामाला मंजुरी मिळाली. मात्र, हे काम लवकर व प्रथम वाघोलीतून सुरू व्हावे यासाठी आमदार अशोक पवार यांनी प्रयत्न केले. लॉकडाऊन पूर्वी या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे पुन्हा ब्रेक लागला होता.
दरम्यान, सहा दिवसांपूर्वी आमदार अशोक पवार यांनी या कामा संदर्भात तसेच वाघोली येथे दरवर्षी पावसामुळे नाले ,ओढे तुंबतात व पुणे नगर महामार्गावर पाणी येऊन वाहतुक कोंडी होते. याबाबत वाघोली परिसरात पाहणी केली होती. उबाळेनगर परिसरात दोन शोरूम जवळ भराव टाकल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे तेथील शेड काढण्याच्या व नाले मोकळे करण्याच्या सूचना पवार यांनी ग्रामपंचायतीस दिल्या होत्या. याप्रसंगी हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, तहसीलदार सुनील कोळी, सहाय्यक अभियंता उज्वला घावटे, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, शिवदास उबाळे, चाचा जाधवराव, रामकृष्ण सातव, रामभाऊ दाभाडे, संदीप सातव, मच्छिंद्र सातव, राजेंद्र वारघडे, सर्कल, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ओढे नाले खुले करण्याबाबत काम सुरू केले आहे. अतिक्रमण काढण्याबाबत आता कोणताही विषय नाही. जे शेड काढायचे होते त्या मालकांना सांगण्यात आले असून ते स्वतःहा काढणार आहेत. यामुळे ओढे नाले खुले होतील.
- वसुंधरा उबाळे, सरपंच, वाघोली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.