Ganesh Sawant
Ganesh Sawant Sakal
पुणे

Health Center : आरोग्य केंद्रात उपचार न मिळाल्याने कामगाराचा मुत्यू

मनोज कुंभार

वेल्हे तालुक्यातील करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने एका हाँटेल कामगाराचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाला.

वेल्हे, (पुणे) - वेल्हे तालुक्यातील करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने एका हाँटेल कामगाराचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गणेश महादेव सावंत (वय ४५, मुळ राहणार कापडे बुद्रुक, ता. पोलादपुर, जि. रायगड, सध्या रा. आस्कवडी, ता. वेल्हे) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात अकस्मित मयताची नोंद करण्यात आली आहे.

हा प्रकार मंगळवारी (ता. ३) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. आस्कवडीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब दसवडकर यांच्या हाँटेलमध्ये सफाई कामासाठी मयत गणेश सावंत व त्यांची पत्नी असे दोघे जण दोन दिवसांपूर्वी आले होते. मंगळवारी रात्री गणेश याला दम्याचा त्रास होऊ लागल्याने तो पत्नीसह करंजावणे येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी आला. मात्र तेथे डॉक्टर नसल्याने त्याला आवश्यक उपचार मिळाले नाही एक पारिचरीका व एक शिपाई असे दोन कर्मचारी केन्द्रात होते.

गणेश याला पुन्हा त्यास होऊन त्याची प्रकृती गंभीर बनली. मात्र रुग्णवाहिकाही नसल्याने त्याला तेथुन दुसऱ्या दवाखान्यात जाता आले नाही. थोड्या वेळाने गणेश याचा आरोग्य केंद्रातच तडफडून मृत्यू झाला.

या बाबत वेल्हे तालुक्याचे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुर्यकांत कारळे म्हणाले की, मयत गणेश सावंत आरोग्य केंद्रात आले त्यावेळी तेथे डॉक्टर नव्हते. कंरजावणे केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दोन्ही जागा रिक्त आहेत. त्यामुळे शेजारील आंबवणे उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तात्पुरता प्रभारी जबाबदारी दिली आहे. ते साडेचार वाजता आंबवणे येथे निघून गेले होते.

डॉक्टर अभावी रुग्णांना उपचार मिळत नाही. अशी वेळ येणार नाही यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. करंजावणे केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे दिला आहे.

वेल्हे पोलिस ठाण्याचे अंमलदार योगेश जाधव म्हणाले, गणेश सावंत हे डॉक्टर तपासणी पुर्वी मयत झाल्याचे पत्र कंरजावणे केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गणेश सावंत याचा मुत्यू झाला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मयताचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात कोणीही तक्रार दाखल केली नाही.

शिवसेनेचे वेल्हे तालुका प्रमुख दिपक दामगुडे म्हणाले, अनेक महिन्यांपासून तालुक्यातील आरोग्य केंद्रात पुरेसे डॉक्टर कर्मचारी नाहीत त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. जिल्हा परिषदेने आवश्यक कर्मचारी डॉक्टर नियुक्त करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT