Worker
Worker 
पुणे

लॉकडाऊन संपला अन् कर्मचारी परतले कामावर...

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची गाडी हळूहळू रुळावर येऊ लागली असून या महिन्यात उत्पादन सुमारे 40 टक्के क्षमतेने सुरू झाल्याचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅंग अॅग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) सर्वेक्षणात आढळून आले आहे. मात्र, नव्या ऑर्डर्सचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात उद्योग काही प्रमाणात सुरू होते. या दरम्यान चेंबरने चौथ्यांदा सर्वेक्षण केले. पूर्वीच्या पहिल्या दोन सर्वेक्षणात उद्योगांच्या समस्या तर तिसऱया सर्वेक्षणात उत्पादकता, मनुष्यबळ आदींवर भर होता. या सर्वेक्षणात 135 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा समावेश आहे. त्यात उत्पादन, मनुष्यबळ आदींबाबत प्रश्न विचारण्यात आले. उद्योगांना कच्चा माल पुरविणाऱया पुरवठा साखळीमध्ये अजूनही काही प्रमाणात समस्या असल्याचे त्यात आढळून आले आहे तसेच नव्या ऑर्डर्सची अनिश्चितता उद्योगांसाठी चिंतेची बाब  आहे. 

सर्वेक्षणात 48 टक्के उत्पादन, 29 टक्के सेवा आणि 23 टक्के संमिश्र क्षेत्रातील एकूण 135 उद्योगांचा समावेश आहे. त्यातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग जुलै महिन्यात सुमारे 40 टक्के क्षमतेने सुरू असल्याचे दिसून आले आहे तर, सरासरी 47 टक्के मनुष्यबळ कामावर उपस्थित आहे. जून महिन्यातील सर्वेक्षणात उद्योग 27 टक्के क्षमतेने सुरू असल्याचे आढळले होते. तर ऑगस्ट महिन्यात उद्योग 60 टक्के क्षमतेने सुरू होतील, असा अंदाज आहे. ज्या प्रमाणात उद्योगांना नव्या ऑर्डर्स मिळतील, त्या प्रमाणात उत्पादन क्षमतेत वाढ होईल आणि त्यातून मनुष्यबळही वाढेल, असेही निरीक्षण या सर्वेक्षणातून नोंदविण्यात आले आहे. 

मध्य महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा; १२ तासांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस

जिल्हा प्रशासनाचा मदतीचा हात 
पुणे जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या 10 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये उद्योग सुरू राहतील, यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष काळजी घेतली होती. तसेच दुचाकीवरूनही कामगारांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली होती, त्याचाही उद्योगांना उपयोग झाल्याचे या सर्वेक्षणातून आढळून आले आहे. 

पुणे : जुन्नर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची चिंता होणार कमी; कारण...

उद्योगाचा प्रकार --------मनुष्यबळ ----------उत्पादन 
सूक्ष्म ------------------------39 टक्के -----------30 टक्के
लघु ---------------------------48 टक्के -----------43 टक्के
मध्यम ------------------------65 टक्के ----------57 टक्के 
मोठे उद्योग------------------54 टक्के -----------40 टक्के 
-----------------------------------------------------------------------------------
सरासरी मनुष्यबळ 47 टक्के --- उद्योगांचे सरासरी उत्पादन 40 टक्के

प्रशांत गिरबने (महासंचालक, एमसीसीआयए) - लॉकडाउनच्या काळात मर्यादीत स्वरूपात उद्योग सुरू होते. ते आता सावरू लागले आहेत. प्रशासकीय प्रक्रियाही सुलभ झाली आहे. या काळात जिल्हा प्रशासन, पोलिस, उद्योग विभाग यांच्यात चांगला समन्वय झाला आणि त्यातून उद्योगांची गाडी वेगाने धावेल, अशी अपेक्षा आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT