aptale 
पुणे

घराच्या ओढीने काळीज तुटत होतं, पण असा झाला घोळ... 

मीननाथ पानसरे

आपटाळे (पुणे) : जुन्नर तालुक्‍यातून यवतमाळला जाण्यासाठी जवळपास दीडशेहून अधिक मजूर सावरगाव येथे रविवारी (ता. 10) पहाटे पाच वाजल्यापासून जमले, मात्र दुपारचा एक वाजून गेला, तरी एसटी बस आल्या नाहीत. एसटी विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका या मजुरांना बसला. तब्बल सात तासांहून अधिक वेळ मजुरांना एसटी बसची वाट पाहत तिष्ठत बसावे लागले. अखेर दीडच्या सुमारास एसटी बस आल्याचे पाहतच मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला. 

राज्य सरकारने राज्यातील विविध भागातील मजुरांना सोडण्यासाठी मोफत एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जुन्नर तहसील कार्यालयाच्या वतीने यवतमाळला जाणाऱ्या जवळपास 150 मजुरांना रात्री उशिरापर्यंत तहसीलदार हनुमंत कोळेकर, निवासी नायब तहसीलदार सचिन मुंढे, मंडलाधिकारी शोभा भालेकर यांनी निरोप देऊन सकाळी 10 वाजेपर्यंत सावरगाव येथे येण्याच्या सूचना दिल्या.

गावी जायची ओढ असल्याने मजूर पहाटे पाच वाजल्यापासूनच लहान मुलाबाळांसह उपाशीपोटी सावरगाव येथे हजर झाले. काहीजण पायपीट करून एसटी बस मिळेल, या आशेने हजर झाले. तालुका प्रशासनाने देखील या मजुरांची आरोग्य तपासणी करून घेतली. मात्र, नारायणगाव आगारातून निघालेल्या एसटी बस सावरगाव येथे पोहचल्याचं नाहीत. याबाबत एसटी आगर नियंत्रक यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, वरिष्ठ कार्यालयाकडून एसटी बस आहेत तेथे जैसे थे उभ्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

या घोळात दुपारचे बारा वाजून गेले, तरी एसटी बस येत नसल्याने एसटी विभागाच्या ढिसाळ नियोजनावर मजुरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, वरिष्ठ प्रशासनाकडून आदेशावर आदेश बदलत असल्याने स्थानिक प्रशासन मात्र नियोजन करताकरता थकत गेले. मात्र, दुपारी दीडच्या सुमारास एसटी बस नारायणगाव आगारातून सावरगाव येथील मजुरांना नेण्यासाठी आल्या. त्या पाहून मजुरांचा चेहरा आनंदाने फुलला. एकूण सात एसटी बसमधून लहान मुले व महिलासह तब्बल 150 मजूर रवाना करण्यात आले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

दरम्यान, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. लुपिन फाउंडेशनच्या वतीने या मजुरांना केळी, बिस्किटे व पाण्याचे वाटप करण्यात आले. मजुरांनी तालुका प्रशासनाचे धन्यवाद मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finance Manager Murder Case : ६ लाखांच्या कर्जासाठी फायनान्स मॅनेजरची हत्या; प्रेमी युगुलाचा धक्कादायक कट

Parent Care: खानगावमध्ये मातृ-पितृ सेवेला सलाम; दशक्रिया विधीत विजय बोंबले दांपत्याचा ‘उत्कृष्ट मातृ पितृ सेवा पुरस्कार’ देऊन गौरव

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

SCROLL FOR NEXT