Court Sakal
पुणे

कमवित्या पत्नीला दरमहा दहा हजार रुपये अंतरिम पोटगी द्यावी; न्यायालयाचा आदेश

कौटुंबिक वादामुळे पत्नीने येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. पतीकडून अंतरिम पोटगी मिळण्याची मागणी त्या अर्जात करण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

कौटुंबिक वादामुळे पत्नीने येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. पतीकडून अंतरिम पोटगी मिळण्याची मागणी त्या अर्जात करण्यात आली होती.

पुणे - कमावत्या पत्नीला (Working Wife) दरमहा १० हजार रुपये अंतरिम पोटगी (Alimony) देण्याचा आदेश येथील कौटुंबिक न्यायालयाने (Family Court) दिला आहे. याबरोबरच तक्रार अर्जाचा खर्च (Expenditure) म्हणूनही पाच हजार रुपये देण्यात यावेत, असेही कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश आर. एस. आराध्ये यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे. राहणीमानातील तफावतीमुळे व पतीने कमी उत्पन्न दाखविल्याने न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

कौटुंबिक वादामुळे पत्नीने येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. पतीकडून अंतरिम पोटगी मिळण्याची मागणी त्या अर्जात करण्यात आली होती. ॲड. पुष्कर पाटील, ॲड. साजन महबुबानी आणि ॲड. अमित परदेशी यांच्यामार्फत महिलेने हा दावा दाखल केला होता. पत्नी नोकरी करत असून, तिला दरमहा ३२ हजार रुपये पगार आहे. तर पतीने दरमहा २५ हजार रुपये पगार असल्याची न्यायालयात माहिती दिली. राहणीमान, उत्पन्न यातील फरक आणि पती ऐशआरामाचे जीवन जगत आहे. पतीच्या नावावर लाखो रुपयांच्या जमिनी आहेत. शिवाय दोन महागड्या गाड्या आहेत. तसेच, त्याच्या आईची कंपनी आहे. त्यामध्ये तो कामाला असल्याचे दाखवत आहे, असे दाव्यात दाखल करण्यात आले आहे. वास्तविक पती हा त्या कंपनीत संचालक आहे. त्याचे राहणीमान उच्च असल्याचे पुरावे न्यायालयात दाखल करीत पोटगी देण्याची मागणी केल्याचे ॲड. पाटी यांनी दिली. या प्रकरणात न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यावरून पती न्यायालयाची दिशाभूल करत असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Ticket: रेल्वे प्रवास महाग होणार! ट्रेन तिकिटांच्या किमती किती वाढणार? आकडेवारीतून माहिती आली समोर

Air India Flight Grounded : 'एअर इंडिया'च्या विमानात फ्यूल कंट्रोल स्विचमध्ये बिघाड!, उड्डाण ऐनवेळी थांबवले

UPI Transaction: अखेर संभ्रम संपला! यूपीआय व्यवहारांवर शुल्क लागणार का? केंद्र सरकारनं स्पष्ट उत्तर दिलं, महत्त्वाची माहिती समोर

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाप्रकरणी अमोल खुणेला जामीन; धनंजय मुंडेंसोबत बोलणं झालं होतं का?

Latest Marathi News Live Update: पोर्श कार अपघात प्रकरणी तिघांना जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT