yashwantrao chavan auditorium pune sakal
पुणे

Pune News : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ४० दिवस राहणार बंद

बालगंधर्व रंगमंदिरापाठोपाठ रसिकांच्या आवडीचे आणि हक्काचे नाट्यगृह असणारे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ६ जुलैपासून सुमारे ४० दिवसांसाठी राहणार बंद.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बालगंधर्व रंगमंदिरापाठोपाठ रसिकांच्या आवडीचे आणि हक्काचे नाट्यगृह असणारे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ६ जुलैपासून सुमारे ४० दिवसांसाठी बंद राहणार आहे. नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणेच्या संपूर्ण संचाच्या (एसी प्लांट) दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. पावसाळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि नाटकांची संख्या तुलनेने कमी असल्याने या काळात दुरुस्ती पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असेल.

कोथरुड परिसरात असलेल्या या नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणेत अनेक दिवसांपासून बिघाड झाला होता. तात्पुरती दुरुस्ती करून त्यावर मलमपट्टी केली जात होती. मात्र, मुळातून हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी संपूर्ण यंत्रसंच बदलणे आवश्यक होते. गेल्या काही दिवसांपासून शहरातील नाट्यगृहांच्या दुरावस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यात या वातानुकूलित यंत्रणेच्या बिघाडाचाही समावेश होता. कलाकारांसह प्रेक्षकांनी या विरोधात सातत्याने तक्रार केल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्याची दखल घेतली आणि अधिकाऱ्यांना नाट्यगृहांच्या समस्या तातडीने सोडवण्याचे आदेश दिले.

त्यानुसार आता प्रशासनाने पावले उचलायला सुरूवात केली असून त्याअंतर्गत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. जुलै महिन्यात पावसाळ्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि नाट्यप्रयोगांची संख्या अल्प असते. त्यामुळे या काळात नाट्यगृह बंद राहिल्यास निर्मात्यांचे कमीत कमी नुकसान होईल, हे लक्षात घेऊन हा मुहूर्त प्रशासनाने निवडला आहे. ६ जुलैपासून नाट्यगृह बंद होणार असून ४० दिवसांत, म्हणजे १५ ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या काळातील सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि नाट्यप्रयोगांचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे.

‘इतर दुरुस्त्याही याच काळात व्हाव्या’

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सांडपाणी वाहिनीत काही ठिकाणी गळती, प्रेक्षागृहातील काही खुर्च्यांचे हात तुटलेले, अशा इतरही काही समस्या आहेत. हे वरकरणी किरकोळ बिघाड वाटत असले, तरी त्यांची दुरुस्ती आवश्यक आहे. या दुरुस्त्या देखील याच काळात व्हाव्यात, जेणेकरून नाट्यगृह पुन्हा सुरू झाल्यानंतर ते समस्याविरहित असेल, अशी अपेक्षा कलाकारांनी आणि रसिकांनी व्यक्त केली.

वातानुकूलित यंत्रसंच बदलण्याच्या कामासाठी ४० दिवस लागतील, असे विद्युत विभागाने आम्हाला सांगितले आहे. ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी विनंती आम्ही केली आहे. भवन विभागातर्फे देखील नाट्यगृहाच्या देखभालीची कामे या काळात केली जातील.

- चेतना केरुरे, उपआयुक्त - सांस्कृतिक विभाग, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT