Bhimashankar 
पुणे

भाविकांनो, भीमाशंकरच्या श्रावणातील यात्रेबाबत प्रशासनाने घेतलाय मोठा निर्णय

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव (पुणे) : श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भरणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भीमाशंकर येथील मंदिर बंद असल्याने भाविकांनी दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी येऊ नये. तेथे येणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सहायक जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.     

मंचर (ता. आंबेगाव) येथील अस्मिता भवन येथे बुधवारी (ता. 8) श्री क्षेत्र भीमाशंकर यात्रा बंद ठेवण्याच्या पार्श्वभुमीवर पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी डुडी यांनी माहिती दिली. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी, घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक प्रदिप पवार, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाउन झाले. तेव्हापासून श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर बंद आहे. श्रावण महिना 21 जुलैपासून सुरू होणार आहे. त्यामुळे भाविक आणि पर्यटकांनी येथे येऊ नये. मंदिर बंद असून पर्यटनही बंद आहे. भाविकांनी आणि पर्यटकांनी प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा तेथे येणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रांतअधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला.  

उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे म्हणाले की, श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात दर्शनासाठी, पर्यटनासाठी कोणीही येऊ नये. डिंभे आणि पालखेवाडी येथे पोलिसांनी चेकपोस्ट उभारले आहे. जर कोणी या भागात फिरताना आढळल्यास गाडी जप्त करून संबधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहे. प्रशासनास सहकार्य करावे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT