पुणे

कोरोना साथीच्या लढाईत "वायसीएम'कडून यशस्वी मुकाबला 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - "पांढरा हत्ती' अशी टीका होणारे महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अर्थात "वायसीएम' सध्या कोरोनाचा संसर्ग झालेल्यांसाठी जीवनसाथी ठरले आहे. कारण, कोणतीही लस उपलब्ध नसताना रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवून इच्छाशक्ती प्रबळ केली जात आहे. डॉक्‍टर, नर्स यांच्याकडून योग्य उपचार व मार्गदर्शन मिळत आहे. आतापर्यंत चौदा दिवस उपचार घेऊन तब्बल 18 जण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. 

पिंपरीतील संत तुकारामनगरमध्ये वायसीएम रुग्णालयाची मुहूर्तमेढ तीस वर्षांपूर्वी रोवली गेली. तेव्हापासून त्याच्यावर होणारा खर्च व मिळणारे उत्पन्न यातील कोट्यवधी रुपयांची तफावत पाहून "पांढरा हत्ती' पोसायचा कशाला अशी टीका होऊ लागली. मात्र, सध्याचे कोरोनाचे संकट व दोन वर्षांपूर्वी येऊन गेलेली स्वाइन फ्लूची साथ या काळात वायसीएमनेच रुग्णांना "साथ' दिली आहे. एरवी खासगी रुग्णालये रुग्णांबाबत "हात' वर करतात. तेव्हा वायसीएमच मदतीला येते आणि यशस्वी उपचार होतात. त्यामुळे हळूहळू नागरिकांना वायसीएमचे महत्त्व पटू लागले आहे. गेल्या तीन वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू झाला आहे. त्यामुळे डॉक्‍टरांची संख्या वाढली आहे. सात मजल्यांचे एक मल्टिस्पेशालिटी रुग्णालय म्हणून ओळख निर्माण झाली आहे. सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण रुग्णालयच राखीव केले आहे. अन्य रुग्ण शेजारच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले आहेत. या बाबत पंधरा दिवसांपूर्वी दोन्ही रुग्णालयांत सामंजस्य करार झाला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

असा झाला विस्तार 
सुरुवातीला तळ मजला बांधून झाल्यावर 100 खाटांची व्यवस्था करून रुग्णालय सुरू करण्यात आले. त्यानंतर तीन मजले उभारले. त्यामुळे 350 खाटांची व्यवस्था झाली. पाचवा मजला बांधून झाला तेव्हा 750 खाटांची व्यवस्था झाली. 1996 मध्ये एनआयसीयू व 1999 मध्ये आयसीयू कक्ष सुरू केला. 

"स्वाइन फ्लू'त मोलाची साथ 
स्वाइन फ्लू या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यावेळीही वायसीएममध्ये आयसोलेशन कक्ष उभारला होता. 2017-2018 व 2018-2019 या दोन वर्षांत स्वाइन फ्लूचे अनुक्रमे 379 व 247 असे 626 रुग्ण आढळले होते. त्यातील 62 जणांचा मृत्यू झाला होता. सध्या शहरात गेल्या दीड महिन्यात कोरोनाचे 64 रुग्ण आढळले आहेत. त्यातील केवळ दोघांचा मृत्यू झाला आहे. यातील एका महिलेवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. तर वायसीएममध्ये मृत्यू झालेली व्यक्तीची प्रकृती दाखल होण्यापूर्वीच गंभीर होती, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. 

अन्य रुग्णालयांचीही मदत 
वायसीएमपाठोपाठ महापालिकेने भोसरीत नवीन मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारले आहे. त्याचे उद्‌घाटन अद्याप व्हायचे आहे. मात्र, कोरोना संसर्ग झालेल्यांसाठी आयसोलेशन व संशयितांसाठी क्वारंटाइन कक्ष सुरू केला आहे. तसेच, पिंपरीतील जिजामाता व चिंचवडच्या तालेरा रुग्णालयाचा विस्तार करून तिथेही मल्टिस्पेशालिटी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

दृष्टिक्षेपात वायसीएम 
बांधकाम परवाना : मार्च 1988 
बांधकाम पूर्ण : ऑगस्ट 1992 
क्षेत्र : 45 हजार 167 चौरस मीटर 
खाटा : 750 

हेल्पलाइन 
दूरध्वनी : 020-67332222, 67332111, 67332112, 67332114 
सारथी : 8888006666 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT