रामवाडी (पुणे) : गणरायाच्या आगमनानंतर गौराईचे घरोघरी आगमन झाले. यंदा कोरोनामुळे एकमेकांच्या घरी न जाता गौरी गणपतीचे दर्शन ऑनलाइन घेण्यावर नागरिकांनी भर दिला. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात महिला एकमेकींच्या घरी जातात. परंतु, यावर्षी हळदी कुंकवालाही जाता येणार नसल्याने अनेक महिला खंत व्यक्त करत आहेत.
गौरीचे आगमन झाल्यानंतर तिला पहिल्या दिवशी भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी या माहेरवाशिणीला पुरणपोळ्या, सोळा प्रकारच्या भाज्या, चटण्या तसेच फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. याच दिवशी संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो. रात्री महिलांचा झिम्मा फुगड्यांचा खेळ रंगतो. तिसऱ्या दिवशी दही-धपाटे, अळूच्या वड्या आणि कानोल्याचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी गौरीचे विसर्जन केले जाते. पण यावर्षी कोरोनामुळे घरातल्या घरात साध्या पद्धतीने गौरीचा सण साजरा केला जात आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
व्हॉट्सअप द्वारे मैत्रिणींना, नातेवाइकांना फोटो पाठवण्यात येत आहे. तर काही ठिकाणी मैत्रिणींना, नातेवाइकांना व्हिडिओ कॉलद्वारे घरातील गणपती गौरीचे दर्शन घडवले जात आहे. याबाबत सुवर्णा जोगदंड म्हणाल्या, "माझ्या माहेरी गौरी गणपती असतात. कोरोनामुळे यावर्षी आईकडे जात आले नाही. पण आईने व्हिडिओ कॉलवर मला गणपती गौरीचे दर्शन घडविले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.