Sakal-Vidya 
पुणे

या वर्षीच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन कशा होणार? याविषयी होणार मार्गदर्शन

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट (एमबीए, एमसीए), आर्किटेक्‍चर व इतर अभ्यासक्रमांच्या आणि डिप्लोमानंतर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया या वर्षी केंद्रीय पद्धतीने (ऑनलाइन) कशी राबविणार, याविषयी अनेक प्रश्‍न विद्यार्थी व पालकांच्या मनात आहेत. याच अनुषंगाने ‘सकाळ विद्या’ आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ यांच्यातर्फे विनामूल्य मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोथरूड येथे मयूर कॉलनीतील एम.ई.एस. ऑडिटोरियम (बालशिक्षण मंदिर कॅम्पस) मध्ये रविवारी (ता. २०) सकाळी साडेदहा वाजता चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या चर्चासत्रात ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने कशी होणार आहे? प्रवेशाच्या किती फेऱ्या होणार व कशा होणार? ही प्रवेश प्रक्रिया केव्हापर्यंत चालेल? महाविद्यालये कधी सुरू होणार याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळून या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. त्यामुळे जागा मर्यादित असल्याने प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. 

कोणत्या शाखेत जायचे हे निश्‍चित झाले असले, तरीही सीईटी किंवा जेईईच्या गुणांच्या (पर्सेंटाईल) आधारे कॉलेजची प्राथमिकता कशी ठरवावी व त्यासाठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा, योग्य कॉलेजची निवड कशी करावी, याची माहिती विद्यार्थी व पालकांना असली की ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना गोंधळ होत नाही. पीसीएममध्ये ४५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी गुण असतील, तर कोणते पर्याय उपलब्ध आहेत? त्याचबरोबर शैक्षणिक कर्ज, कटऑफ, स्कॉलरशिप व डिप्लोमानंतर इंजिनिअरिंगची दुसऱ्या वर्षाची प्रवेशप्रक्रिया या विषयांवर तज्ज्ञ वक्ते डॉ. शीतलकुमार रवंदळे मार्गदर्शन करणार आहेत. तर आर्किटेक्‍चरमधील करिअर, प्रवेश व कॉलेजचे पर्याय यावर डॉ. महेंद्र सोनवणे तसेच प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता, बारावीनंतर उपलब्ध संधी,  कॉलेजचे पर्याय व शाखांची (ब्रांच) निवड कशी करावी याविषयी प्रा. विजय नवले मार्गदर्शन करतील. विद्यार्थी व पालकांच्या या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधी असलेल्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे या चर्चासत्रातून मिळतील.
‘ई-स्क्रुटनी’ म्हणजे काय? ऑनलाइन फॉर्म भरताना होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात याचे प्रात्यक्षिक प्रा. केतन देसले दाखवतील. त्यामुळे नक्कीच सहभागी व्हा. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 4th T20I: श्रेयस अय्यरचा विश्वविक्रम, तर भुवीची जागा घेणाऱ्या मयंक यादवचे न्यूझीलंडला ५ ओव्हरमध्येच मोठे धक्के

Malegaon Commissioner ₹80000 Bribe Case : निवृत्तीला अवघे दोन दिवस उरले असताना मालेगाव महापालिकेचा आयुक्त एसीबीच्या जाळ्यात; 80 हजारांची लाच घेताना अटक

बापरे! तेजश्रीच्या पायाला गंभीर दुखापत? दीड महिन्यांपासून असलेलं फ्रॅक्चर दाखवत सांगितलं कारण

दुष्काळाचं सावट, रब्बी हंगामाची चिंता; शेतकऱ्यांसाठी महाबीजने आखलं ३.९८ लाख क्विंटल बियाण्यांचं नियोजन

Marathi News Live Updates : समृद्धी महामार्ग रोखून शेतकऱ्यांचे आंदोलन; आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT