jail sakal
पुणे

Yerawada Jail : कैद्याचा कारागृहातच २७ लाखांचा कारनामा

मनीऑर्डर पुस्तिकेत अधिकाऱ्यांसह कैद्यांच्या बनावट सह्या; कँटीनमधून वस्तूंची खरेदी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने कारागृहातील अधिकाऱ्यांच्या बनावट सहीद्वारे मनीऑर्डर पुस्तिकेत फेरफार करून २६ लाख ६९ हजार ९११ हजार रुपयांचा अपहार केला. मनीऑर्डर आलली नसूनही पैसे जमा असल्याचे दाखऴून त्याने कारागृहातील कॅन्टीनमध्ये खर्च केला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी कैदी सचिन रघुनाथ फुलसुंदर (मुळ रा. जुन्नर) याच्यावर गुन्हा देखल केला.

या प्रकरणी कारागृह अधिकारी बाबूराव मोटे यांनी फिर्याद दिली आहे. फेब्रुवारी २०२१ ते ऑगस्ट २०२३ दरम्यान हा प्रकार घडला. बलात्कार तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फुलसुंदरवर २००६ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कारखाना विभागात तयार होणाऱ्या वस्तू बाहेर विक्रीस पाठविण्याचा बहाणा करून त्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विश्‍वास संपादन के ला. त्यानंतर त्याने मनीऑर्डरच्या नोंदणी पुस्तिकेत अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या, बनावट हिशेब, तसेच अन्य कैद्यांच्या बनावट सह्या करून फेरफार केले.

या बाबत येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अशोक काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कैद्यांचे नातेवार्इक कैद्यांच्या खर्चासाठी मनीऑर्डरने पैसे पाठवित असतात. कँटीनमध्ये काही वस्तू घेण्यासाठी कैदी ते वापरतात. कैद्यांची मनी ऑर्डर आल्यानंतर कारागृह प्रशासन ते पैसे स्वीकारते व त्यांची पुस्तिकेत नोंदणी केली जाते. त्यानुसार प्रत्येक कैद्यांचे खाते तयार केले जाते. खात्यातील जमा पैसे कैदी वापरू शकता.

फुलसुंदरने मनीऑर्डर नसूनही स्वतःच्या आणि इतर कैद्यांच्या नावे पैसे आल्याची नोंद केली. त्याआधारे त्याने तसेच त्याच्या साथीदारांनी कॅन्टीनमधून विविध वस्तू घेतल्या. खाद्यपदार्थ व कपडे अशा बाबींवर त्याने हे पैसे खर्च केले आहेत. हा प्रकार कारागृहातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक अशोक काटे अधिक तपास करीत आहेत.

मनीऑर्डर विभागासाठी अधिकारी नियुक्त

हा प्रकार उघड झाल्यानंतर कारागृह प्रशासनाने मनीऑर्डर विभागासाठी त्वरित जबाबदार

अधिकारी नियुक्ती केला. त्याच्या माध्यमातून सर्व व्यवहारांवर नजर ठेवली जाईल. सर्व व्यवहार आता डिजिटल पद्धतीने होतील, अशी माहिती कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गामुळे किंग कोब्रा, पट्टेरी वाघ, गवे, हत्ती, बिबट्यांना धोका, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तीव्र विरोध, कसा असेल मार्ग

Breaking News Live Update: राहुरीत अपक्ष उमेदवाराचा सायकलवर प्रचार; सुजय विखेंचीही घेतली भेट

Pune Politics News: शरद पवारांचा लवकरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा दौरा; नव्याने पक्ष संघटना उभारणीसाठी देवदत्त निकम यांच्यासोबत चर्चा

Asha Bhosle Video : 'या' शाळेत झालं आहे आशा भोसले यांचं शिक्षण, स्वतः व्हिडिओ शेअर करत सांगितल्या होत्या कोल्हापूरच्या गोड आठवणी

Gold Silver Price Impact War : सोने चांदी दरावर अद्याप युद्धाचा परिणाम, आठवड्यातील दराची आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT