you will get groceries with just click ! 
पुणे

किराणा हवा आहे... फक्त क्लिक करा ! 

सकाळवृत्तसेवा

पुणे: किराणा माल घ्यायचा आहे... दुकानात जाऊन यादी द्यायची... मग तेवढा वेळ थांबायचे आणि मग परतायचे... ही प्रक्रिया आता वेबसाईटद्वारे काही मिनिटांत पूर्ण करता येणार आहे... ग्राहकाने फक्त जाऊन किराणा घेऊन यायचा. सॉफ्टवेअरद्वारे किराणा खरेदीचा हा प्रयोग दोन दिवसांपूर्वी  शहरात सुरू झाला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
http://www.kiranaq.com या संकेतस्थळावर त्या साठी ग्राहक आणि किराणा दुकानदार यांनी नोंदणी करायची आहे. ग्राहकाने संकेतस्थळावर त्याच्या घराजवळील किराणा दुकान निवडायचे. संकेतस्थळावर सुमारे 3 हजार वस्तूंची यादी आहे. त्यातून ग्राहकांनी त्यांना हव्या असलेल्या वस्तूंची निवड करायची. ती यादी संबधित दुकानदाराला त्याच्या मोबाईलवरील व्हॉटसअप वर जाते. त्याने त्या वस्तूंचे पॅकिंग पूर्ण केले की, एका लिंकवर क्लिक करायचे. त्या मुळे ग्राहकाला बिल किती झाले आहे, हे समजते. ती रक्कम तो रोख किंवा डिजीटल पेमेंटद्वारे देऊ शकतो. दुकानात पॅक केलेला माल त्याने स्वतः जाऊन घेतल्यावर व्यवहार पूर्ण होतो. 

- खूप महत्त्वाचं : कोरोना लॉकडाऊनमुळे सुधारतोय 'ओझोन'चा थर, शास्त्रज्ञ म्हणतायत... सॉफ्टवेअर डेव्हलपर अजित थडानी या बाबत म्हणाले, "कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे नागरिकांना दुकानांत थांबावे लागू नये, या साठी हे सॉफ्टवेअर उपयुक्त ठरेल. त्यात कोणालाही कसलेही शुल्क द्यावे लागत नाही. सामाजिक जवाबदारीच्या भावनेतून आम्ही हे सॉफ्टवेअर तयार केले आहे." सोशल मीडियावरून आम्ही त्याचा प्रसार करीत असून त्याला किराणा दुकानदार तसेच नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

- Fight with Corona : पाकमधील हिंदू-ख्रिश्चनांना शाहिद आफ्रिदीचा मदतीचा हात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT