पुणे

Pune News : झाडाची फांदी डोक्यात पडल्याने तरुणाचा मृत्यू; बिबवेवाडीतील घटना

योगेश ज्ञानदेव वानेरे (वय २९, रा. सध्या रा. पोकळे वस्ती, बिबवेवाडी, मूळ रा. वाघुड, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. ९ : झाडाची फांदी डोक्यात पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. बिबवेवाडीतील पोकळे वस्ती परिसरात हा प्रकार घडला.

योगेश ज्ञानदेव वानेरे (वय २९, रा. सध्या रा. पोकळे वस्ती, बिबवेवाडी, मूळ रा. वाघुड, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास योगेश वानेरे आणि त्यांचे मित्र सुमीत बगाडे ओटा वसाहतीतील महादेव मंदिराजवळ गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी झाडाची मोठी फांदी तुटली आणि योगेश यांच्या डोक्यात पडली.

फांदी डोक्यात कोसळल्याने योगेश गंभीर जखमी झाले होते. त्यांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. योगेश यांचे मित्र सुमीत या घटनेत बचावले. या घटनेची माहिती परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त अश्विनी राख, बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT