Couple 
पुणे

पुणे : लव्ह लेटर मुलीकडं फेकलं म्हणून तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रेम व्यक्त करणारा संदेश आणि शायरी लिहिलेली असलेले लव्ह लेटर अल्पवयीन मुलीच्या दिशेने फेकणाऱ्या तरुणास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष जिल्हा न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा निकाल दिला. अरुणकुमार भगत (वय २२, रा. तळेगाव दाभाडे) असे शिक्षा सुनावलेल्या तरुणाचे नाव आहे.

२५ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे हा प्रकार घडला होता. घटनेच्या दिवशी मुलगी घराकडे येत असताना आरोपीने तिच्याकडे बघून अश्लील वक्तव्य केले. त्यानंतर तिच्या दिशेने I love you लिहलेली तसेच हिंदी शायरी आणि त्याखाली मोबाईलनंबर असलेली चिठ्ठी फेकल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या खटल्याचे कामकाज सरकार पक्षातर्फे सरकारी वकील विलास घोगरे-पाटील यांनी पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये मुलीची साक्ष तसेच त्यास पृष्टी देणारी आरोपीने फेकलेली चिठ्ठी महत्त्वाची ठरली. तो पुरावा ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. बाललैगिंक अत्याचार प्रतिबंध कायद्यासह विविध कलमांनुसार भगतला दोषी ठरविण्यात आले. तळेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कुंदा गावडे यांनी या गुन्ह्याचा तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयीन कामकाजासाठी त्यांना पोलिस हवालदार नितीन पवार यांनी मदत केली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT