गरिबांच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी तरुणांनी धुतल्या गाड्या sakal
पुणे

गरिबांच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी तरुणांनी धुतल्या गाड्या

सकाळ वृत्तसेवा

विश्रांतवाडी: प्रतीकनगर येथे गरजू व गरिबांच्या घरी दिवाळी साजरी व्हावी म्हणून तरुणांनी स्वतः गाड्या धुऊन निधी जमा केला. दसरा ह्या सणाच्या निमित्ताने श्री अष्टविनायक मित्र मंडळ व राहुल जाधव मित्रपरिवाराने मिळून आम्ही श्रमदान करतो, तुम्ही योगदान करा". असे घोषवाक्य घेऊन दुचाकी वाहन धुण्याचा उपक्रम राबवला.

या उपक्रमातून जमा झालेला निधी हा करोना काळात ज्या घरातील कर्ता व्यक्ती मृत्युमुखी पडलेला आहे, अशा गरीब कुटुंबाला मदत स्वरूपात देण्यात आला.

राहुल जाधव व त्यांच्या मित्रांनी मनोज घोलप यांच्या सहकार्याने त्यांच्या वॉशिंग सेंटरवर नागरिकांच्या गाड्या धुऊन देण्याकरिता मोलाचे श्रमदान केले. या माध्यमातून एकूण १३२ दुचाकी वाहन धुऊन मिळालेल्या १६,७०० रुपयांत स्वतःजवळील रक्कम टाकून चार कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपये धनादेश व साडी चोळी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देण्यात आला.

यावेळी स्त्री शक्ती महिला पतसंस्थेच्या संस्थापिका क्रांती शितोळे, दिलीप पवार , प्रा अरविंद गुजर, माजी नगरसेवक भगवान जाधव,

साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शहा, येरवडा जेलच्या शिक्षिका रजनी मोटके, सज्जनलाल परदेशी, सतीश देशमाने उपस्थित होते. ही आर्थिक मदत कै. संतोष दशरथ पासंगे, कै. उत्तम महादेव पवार, कै. शशिकांत उत्तम गायकवाड, कै. विकास शंकर शिंदे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबातील प्रमुखांच्या नावे देण्यात आली. या उपक्रमाची संकल्पना प्रसिद्ध मूर्तिकार हेमंत सांगवेकर यांची होती तर हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता वॉशिंग सेंटरचे मनोज घोलप, संतोष कांबळे,मनोज कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर कांबळे, रोहित परदेशी, निखिल कांबळे, सूरज पाटील, सोमनाथ डफळ, सम्राट कणसे, अक्षय मोरे, गौरव देशमाने, साहिल जाधव, अमित ठाकूर, भारत डावरे, सुरज ब्रम्हरक्षे दीपक गिरी, सुमित ठाकूर, रोहन कदम आणि राहुल जाधव यांनी कठोर परिश्रम घेऊन मोलाचे श्रमदान केले.

राहुल जाधव म्हणाले की आमच्या टीम वर्कमुळे चार कुटुंबांना आर्थिक माध्यमातून थोडा तरी धीर मिळावा हीच आमची इच्छा आणि अपेक्षा होती. या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT